'नरेंद्र मोदींशी 43 वर्षांची मैत्री मात्र चहा विकताना त्यांना कधीच पाहिलं नाही.'

'नरेंद्र मोदींशी 43 वर्षांची मैत्री मात्र चहा विकताना त्यांना कधीच पाहिलं नाही.'

'केवळ जनतीची सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांनी चहाचा मुद्दा निवडणुकीत वापरला.'

  • Share this:

अहमदाबाद 22 जानेवारी :  लोकसभेच्या 2014 च्या निडणुकीत नरेंद्र मोदींचा 'चाय पे चर्चा' हा कार्यक्रम सगळ्यात जास्त गाजला. 'एक चहा वाला देशाचा पंतप्रधान झाला' हे त्यांचं वाक्यही प्रत्येक सभेत टाळ्या खाऊन अजुनही जाते. त्याचबरोबर या चहा पुराणावर वादही तितकेच झाले आहेत. प्रविण तोगडीया हे मोदींचे अनेक वर्षांचे मित्र. मात्र गेल्या अनेक वर्षात दोघांमध्ये भांडण आहे. आता तर तोगडीया हे विश्व हिंदू परिषदेतून बाहेरच पडले आहेत.

तोगडीयांनी मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मोदींसोबत माझी 43 वर्षांची मैत्री होती, पण मी त्यांना कधीच चहा विकताना पाहिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तोगडीयांच्या या वक्तव्याने पुन्हा वादाचा चहा उकळणार अशी शक्यता आहे.

प्रविण तोगडीया हे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले, "मोदींशी आणि माझी चार दशकांची मैत्री आहे. त्यांना मी चांगलं ओळखतो. मात्र या काळात त्यांना कधीच चहा विकताना पाहिलं नाही. चहाचं भांडवल करत त्यांनी फक्त राजकारण केलं आहे" केवळ जनतीची सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांनी चहाचा मुद्दा निवडणुकीत वापरला अशी टीकाही त्यांनी केली.

संघ परिवारात महत्त्वाचा घटक असलेल्या तोगडीया यांनी भाजप आणि संघपरिवारावरही आरोप केलेत. संघ आणि भाजपला राम मंदिर बांधायचं नाही. राम मंदिर बांधलं तर त्यांच्याजवळचा मुद्दाच संपून जाईल. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे असा आरोपही त्यांनी केला.

राम मंदिराच्या बांधकामासाठी देशभर प्रखर आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला. 9 फेब्रुवारीला हिंदूसाठीच्या नव्या पक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याचंही तोडगडियांनी जाहीर केलं. हा पक्ष निवडणुक लढण्याचीही शक्यता आहे.

First published: January 22, 2019, 5:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading