मुंबई, 10 जून : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याने विविध राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यामध्ये शिवसेनेकडूनही प्रतिक्रिया आली आहे. ' आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ऐनवेळी पंतप्रधानपदासाठी प्रणव मुखर्जी यांचे नाव पुढे करेल. जेणेकरून त्यांना सत्ता कायम राखता येईल. संघाने यादृष्टीने जुळवाजुळव सुरूही केली आहे, असा सनसनाटी दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय.
We feel RSS is preparing itself for a situation where it might put forth Pranab Mukherjee ji as PM name if BJP fails to get required numbers, in any case BJP will lose a minimum of 110 seats this time: Sanjay Raut,Shiv Sena pic.twitter.com/y36dsakELo
— ANI (@ANI) 10 June 2018
आगामी निवडणुकीत भाजप 110 जागांवर हरेल, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
प्रणव मुखर्जींच्या पंतप्रधान होण्याची शक्यता त्यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जींनी नाकारली. या म्हणण्यात काही तथ्य नाही, असं त्या म्हणाल्या.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा