मोदी सरकारमधल्या सर्वांत गरीब केंद्रीय मंत्र्याचं 'हे' घर बघायला लागल्यात रांगा

'माझा भाऊ दोन वेळा आमदार होता, तेव्हासुद्धा हे घर काही बदललं नाही, आता केंद्रात मंत्री म्हणून दिल्लीला गेले, आता तरी यात बदल होणार का माहिती नाही...' देशाच्या सर्वांत गरीब खासदाराच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला नेटवर्क18च्या आनंद दास यांनी.

  • Share this:

हे गवताने शाकारलेलं मातीचं घर देशाच्या केंद्रीय मंत्र्याचं आहे, हे सांगूनही खरं वाटणार नाही. सर्वांत गरीब खासदार, ओडिशाचे मोदी अशी ओळख असणाऱ्या प्रदीपचंद्र सारंगी यांचं हे घर.

ओडिशाचे खासदार प्रदीपचंद्र सरंगी यांचा समावेश नरेंद्र मोदींच्या नव्या कॅबिनेटमध्ये झाला आहे. त्यांच्याकडे लघु-मध्यम उद्योग खातं आणि पशु-मत्स्यपालन दुग्ध व्यवसाय खात्याचं राज्यमंत्रिपद आहे.

सारंगी हे ओडिशाच्या किनारी भागातले लोकप्रिय आणि आत्मीयतेनं काम करणारे भाजप कार्यकर्ते आहेत. ते दोन वेळा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत आणि आता खासदार म्हणून दिल्लीत गेले आहेत.

अत्यंत साधी राहणी, सायकलवरून फिरणं ही त्यांची ओळख. बालासोर जिल्ह्यातल्या निलगिरीजवळचं गोपिनाथपूर हे त्यांचं गाव. तिथे साध्या कुडाच्या भिंती असलेल्या साध्याशा घरात ते राहतात.

सारंगी अविवाहित आहेत. धाकटी बहीण बिलासिनी पांडा आणि तिचा पती मनोरंजन पांडा सारंगी यांच्यासमवेत या घरात राहतात.

"दोनदा आमदार होऊनसुद्धा नानांनी म्हणजे आपल्या मोठ्या भावाने राहणीमानात आणि घरात काही बदल केले नाहीत. आता केंद्रात मंत्रिपद मिळाल्यावरसुद्धा घर बदलेल असं वाटत नाही", असं त्यांची त्यांची धाकटी बहीण बिलासिनी पांडा सांगतात.

प्रदीपचंद्र सारंगी यांनी केंद्रीय मंत्री म्हणू शपथ घेतल्यानंतर हे ओडिशाचे मोदी सोशल मीडियावर ट्रेंडिंग झाले. या सर्वांत गरीब खासदाराचं घर बघायला निलगिरीजवळच्या त्यांच्या छोट्याशा घराबाहेर तीर्थक्षेत्राला असतात तशा लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.

ओडिशातील बालशोर लोकसभा मतदारसंघातून प्रतापचंद्र सारंगी भाजपच्या तिकीटावर विजयी झाले. त्यांनी बीजेडीच्या रविंद्र कुमार जेना यांना 12,956 मतांनी हरवलं. 2014मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, 2019मध्ये मात्र त्यांनी विजय मिळवला.

सोशल मीडियावर प्रचापचंद्र सारंगी यांच्याबद्दल जोरदार चर्चा आहे. त्यांना ओडिशाचे मोदी म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी लग्न देखील केलेलं नाही. आज देखील ते झोपडीत राहतात. त्यांची आर्थिक स्थिती अजिबात चांगली नाही.

प्रतापचंद्र सारंगी यांचा जन्म बालसोर येथील गोपीनथपूर येथील गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासून अध्यात्मिक असलेले सारंगी यांनी पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं आहे.

प्रतापचंद्र सारंगी यांनी साधू बनायचं होतं. त्यासाठी ते रामकृष्ण मठात गेले. पण, मठातील लोकांनी वडील नाहीत तर आधी आईची सेवा करण्याचा सल्ला त्यांना दिला.

सारंगी हे सायकलवरून प्रवास करतात. त्यांनी बालासोर आणि मयूरभंज जिल्ह्यातील आदिवासी भागात शाळा बांधल्या आहेत. वैयक्तिक गरजा कमीत कमी ठेवल्या आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या जवळचे म्हणून प्रतापचंद्र सारंगी यांची ओळख आहे. नरेंद्र मोदी ओडिशाला गेल्यानंतर सारंगी यांची भेट घेतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2019 06:16 PM IST

ताज्या बातम्या