मराठी बातम्या /बातम्या /देश /

मास्टर प्लॅन घेऊनच प्रशांत किशोर करणार काँग्रेसमध्ये प्रवेश, पण...

मास्टर प्लॅन घेऊनच प्रशांत किशोर करणार काँग्रेसमध्ये प्रवेश, पण...

 काँग्रेसमध्ये प्रशांत किशोर यांना कुठले पद द्यावे यासाठी देखील गेल्या तीन-चार दिवसांपासून काँग्रेसचे नेते चर्चा करीत आहे.

काँग्रेसमध्ये प्रशांत किशोर यांना कुठले पद द्यावे यासाठी देखील गेल्या तीन-चार दिवसांपासून काँग्रेसचे नेते चर्चा करीत आहे.

काँग्रेसमध्ये प्रशांत किशोर यांना कुठले पद द्यावे यासाठी देखील गेल्या तीन-चार दिवसांपासून काँग्रेसचे नेते चर्चा करीत आहे.

नवी दिल्ली, 19 एप्रिल : राजकीय रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (prashant kishor join congress) काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र प्रशांत किशोर यांच्या प्रवेशाबाबत काँग्रेसने कमालीची गुप्तता बाळगली आहे. प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशासंदर्भात काँग्रेसचे चार नेते निर्णय घेणार असून यामध्ये मुकुल वासनिक (Mukul Wasnik), दिग्विजय सिंह, रणदीप सिंह सुरजेवाला ( Randeep Singh Surjewala) आणि के सी वेणुगोपाल यांचाा समावेश आहे. या चार नेत्यांची शिफारस आल्यानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

गेल्या चार दिवसात प्रशांत किशोर यांच्या प्रवेशाबद्दल काँग्रेस नेतृत्वाची तीनदा बैठक घेतली. सोबतच मंगळवारी देखील प्रशांत किशोर आणि सोनिया गांधी यांची विस्ताराने बैठक झाल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या तीन बैठकीमध्ये प्रशांत किशोर यांच्या वतीने सादर करण्यात आल्या प्रस्तावावर विस्ताराने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चर्चा करत आहे. महत्त्वाचं म्हणजे, प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये लवकरात लवकर समावेश करावा यासाठी दबाव निर्माण केला जात आहे.

काँग्रेसमध्ये प्रशांत किशोर यांना कुठले पद द्यावे यासाठी देखील गेल्या तीन-चार दिवसांपासून काँग्रेसचे नेते चर्चा करीत आहे. महत्त्वाचं म्हणजे, प्रशांत किशोर यांच्या या माध्यमातून 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे नियोजन कसे करता येईल यासाठी मोठी जबाबदारी त्यांना देण्याच्या संदर्भात पक्षात विस्ताराने चर्चा सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.

गेल्या काही दिवसापासून प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशासंदर्भात चर्चांचे फड रंगले जात आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसात झालेल्या बैठकीच्या माध्यमातून प्रशांत किशोर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित मानला जात आहे. प्रशांत किशोर यांच्यावतीने देण्यात आलेल्या योजनेवर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांनी एक पॅनल ला जाऊ दे दिले असून हे पॅनल एका आठवड्यानंतर काँग्रेस अध्यक्षांना अहवाल सादर करणार आहे. सोबतच या अहवालाच्या आधारावर आगामी काळात मंथन करून चिंतन शिबीर संदर्भात देखील निर्णय घेण्यात येणार आहे.

गेल्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला जोरदार चपराक बसली होती. त्यामुळे यातून सावरण्यासाठी प्रशांत किशोर यांच्याद्वारे देण्यात आलेल्या योजनांना काँग्रेस गांभीर्याने विचार करून आगामी काळात पाऊल टाकण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

First published: