प्रशांत किशोर यांचा जेडीयूमधून पत्ता कट होणार ?

प्रशांत किशोर यांचा जेडीयूमधून पत्ता कट होणार ?

राजकीय पक्षांचे रणनीतीकार प्रशांत किशोर आपल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. नितीशकुमार यांच्या निर्णयाबदद्ल त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचा पक्षातला पत्ता कट होण्याची चिन्हं आहेत.

  • Share this:

पाटणा, 16 मार्च : राजकीय पक्षांचे रणनीतीकार प्रशांत किशोर आपल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. नितीशकुमार यांच्या निर्णयाबदद्ल त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचा पक्षातला पत्ता कट होण्याची चिन्हं आहेत.

जेडीयूने भाजपशी दुसऱ्यांदा युती करू नये, अशा अर्थाचं वक्तव्य प्रशांत किशोर यांनी केलं होतं. भाजपसारख्या पक्षाशी युती करण्याआधी नितीशकुमार यांनी बिहारमधल्या जनमताचा कौल आजमावयला हवा होता, असंही ते म्हणाले होते.

त्यांचं हे वक्तव्य त्यांना महागात पडणार, अशी चिन्हं आहेत कारण त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षातले सगळेच नेते त्यांच्यावर नाराज आहेत.

नितिशकुमार पाठराखण करणार का ?

प्रशांत किशोर हे जेडीयूचे नेते नितीशकुमार यांच्या जवळचे मानले जातात. पण या वक्तव्यानंतर नितिशकुमारही त्यांची पाठराखण करू शकणार नाहीत, असं बोललं जातं.

महागठबंधनमधून बाहेर पडून भाजपसोबत जाण्याच्या नितिशकुमार यांच्या निर्णयावर प्रशांत किशोर अजिबातच खुश नाहीत, असाच याचा अर्थ होतो.

प्रशांत किशोर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रणनीतीकार म्हणून काम केलं आहे. त्यानंतर राजकीय पक्षांसाठीचे उत्कृष्ट रणनीतीकार म्हणून त्यांची ओळख झाली. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेससाठीही काम केलं होतं.अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीशी युती करावी, असा सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला होता.

युतीचे रणनीतीकार

गेल्या महिन्यात प्रशांत किशोर यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतरच भाजप आणि शिवसेनेची युती आकाराला आली होती.

राजकीय व्यूहरचनाकार म्हणून प्रशांत किशोर यांची ख्याती असली तरी त्यांचं जेडीयूमधलं स्थान मात्र डळमळीत झालं आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच त्यांना जेडीयूमधून बाहेर पडावं लागेल, अशी चर्चा आहे. आपलं पक्षातलं स्थान कायम राखण्यासाठी ते काही व्यूहरचना आखतात का हेही पाहावं लागेल.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2019 08:32 PM IST

ताज्या बातम्या