प्रशांत किशोर आता राजकारणाच्या आखाड्यात, 'JDU'त केला प्रवेश

प्रशांत किशोर यांनी आज जनता दल धर्मनिरेपक्ष या पक्षात प्रवेश केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत पाटण्यात झालेल्या जेडीयूच्या बैठकीत त्यांनी पक्षाचं सदस्यत्व घेतलं.

News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2018 03:48 PM IST

प्रशांत किशोर आता राजकारणाच्या आखाड्यात, 'JDU'त केला प्रवेश

पाटणा, ता. 16 सप्टेंबर : प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणारे प्रशांत किशोर यांनी आज जनता दल धर्मनिरेपक्ष या पक्षात प्रवेश केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत पाटण्यात झालेल्या जेडीयूच्या कार्यकारीणीच्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी जेडीयूचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारत पक्षात प्रवेश केला. त्यामुळं आत्तपर्यंत राजकीय पक्षांसाठी व्युव्हरचना तयार करणारे तज्ज्ञ असलेले प्रशांत किशोर आता थेट राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहेत.

2014 च्या निवडणुकीत भाजपला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळाला. त्यावेळी भाजपने आखलेला निवडणुकीचा प्रचार आक्रमक आणि खूप वेगळा ठरला. त्या मागे प्रशांत किशोर यांचं डोकं आणि नियोजन होतं. त्यानंतर किशोर देशभर चर्चेत आले.

नंतर भाजपशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासाठी काम केलं आणि बिहारमध्ये जेडीयूला यशही मिळालं. भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर बिहारचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला होता.

राजदपासून वेगळं झाल्यानंतर नितीशकुमार यांनी भाजपशी घरोबा केला होता. आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांचा जेडीयूतला प्रवेश महत्वाचा मानला जातो. किशोर हे मुळचे बिहारमधल्या बक्सरचे आहेत. इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेत जावून 'ब्रॅण्डींग'चं खास शिक्षण घेतलं.

युनिसेफमध्ये त्यांनी नोकरीही केली. मात्र ती नोकरी सोडून ते भारतात आले आणि त्यांनी नरेंद्र मोदींना 2014 च्या निवडणुकीत मदत केली. आता प्रत्यक्ष राजकारणाच्या आखाड्यात उतरल्याने बिहारचं राजकारणात आता अधिक रंगत येणार आहे.

Loading...

VIDEO : पेट्रोल फुकट मिळत असल्यानं झळ नाही म्हणणाऱ्या आठवलेंनी मागितली माफी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2018 03:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...