भाजपला दणका, मित्रपक्षातील नेत्याने राहुल गांधींना केलं 'हे' आवाहन

भाजपला दणका, मित्रपक्षातील नेत्याने राहुल गांधींना केलं 'हे' आवाहन

अमित शहा यांचा महत्त्वाकांक्षी असलेल्या या कायद्याला भाजपचेच मित्रपक्ष विरोध करू लागले आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (citizenship amendment act 2019) देशभरात विविध मतप्रवाह समोर येत आहेत. विविध विद्यापीठांसह अनेक मोठ्या शहरांमध्ये या कायद्याला विरोध करत आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महत्त्वाकांक्षी असलेल्या या कायद्याला भाजपचेच मित्रपक्ष विरोध करू लागले आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू हा पक्ष सध्या एनडीएमध्ये सहभागी आहे. मात्र स्वत: नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी या कायद्याला विरोध दर्शवला होता. तसंच बिहारमध्ये हा कायदा लागू करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता जेडीयूचेच दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांनीही या कायद्याविरोधात मोर्चेबांधणी केली आहे. तसंच ट्विटरद्वारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आवाहनही केलं आहे.

'नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA)आणि NRC विरुद्ध जनतेच्या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल राहुल गांधी तुमचं स्वागत. पण तुम्हालाही माहीत आहे की आंदोलनाशिवायच राज्यांनीही या NRC ला विरोध करण गरजेचं आहे. त्यामुळे काँग्रेसचं सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये NRC लागू करण्यात येणार नाही, अशी भूमिका घेऊन काँग्रेसच्या नेतृत्वाने याबाबतची अधिकृत घोषणा करावी,' अशी मागणी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून (CAA)सध्या देशभर असंतोष निर्माण झाला आहे. अनेक राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये निदर्शने होत असून त्यांना हिंसक वळण मिळालं आहे. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसने या मुद्यावरून देशभर आंदोलनं केली आहेत. तसंच याबाबत झालेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला. देशभर वातावरण तापलेलं असताना भाजप आता CAAवरून निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासाठी मैदानात उतरला आहे. देशभर सभा आणि पत्रकार परिषदा घेऊन भाजप सरकारची बाजू मांडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2019 10:29 AM IST

ताज्या बातम्या