Home /News /national /

प्रशांत भूषण यांनी भरला 1 रुपयाचा दंड, पण दाखल करणारा फेरविचार याचिका

प्रशांत भूषण यांनी भरला 1 रुपयाचा दंड, पण दाखल करणारा फेरविचार याचिका

भूषण यांनी विद्यमान आणि माजी सरन्यायाधीशांबद्दल वादग्रस्त ट्वीट केले होते.

    नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी वरिष्ठ वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांनी अखेर ठोकावलेला दंड भरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)  प्रशांत भूषण यांना 1 रुपयाचा दंड ठोठावला होता. परंतु, आपल्याला शिक्षा म्हणून सुनावण्यात आलेला दंडाच्या निर्णयाविरोधात प्रशांत भूषण फेरविचार याचिका दाखल करणार आहे. सर्वोच्च न्यायलाय अवमान प्रकरणात प्रशांत भूषण यांना 1 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड न भरल्यास त्यांना तीन महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा होणार असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला. अखेर आज प्रशांत भूषण यांनी 1 रुपयांचा दंड भरला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना प्रशांत भूषण म्हणाले की, 'भारतात आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे धोक्यात आहे. सरकारच्या विरोधात बोलण्यापासून आजही रोखले जात आहे.' मला जो दंड ठोठावण्यात आला होता तो मी भरला आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारला आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात आजच फेरविचार याचिका दाखल करणार आहे, असंही प्रशांत भूषण यांनी सांगितले. काय आहे प्रकरण? भूषण यांनी विद्यमान आणि माजी सरन्यायाधीशांबद्दल वादग्रस्त ट्वीट केले होते. 14 ऑगस्ट रोजी या ट्वीटवरील प्रशांत भूषण यांचे स्पष्टीकरण कोर्टाने फेटाळले आणि त्यांना अवमान केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं. कोर्टाने भूषण यांना बिनशर्त माफी मागण्यासाठी वेळ दिला होता. मात्र प्रशांत भूषण यांना दंड अथवा शिक्षेला सामोरं जाईन पण माफी मागणार नाही अशी भूमिका स्वीकारली होती. त्यानंतर कोर्टानं त्यांना 1 रुपये दंड ठोठावला होता. प्रशांत भूषण यांनी माफी मागण्यास का दिला नकार? प्रशांत भूषण यांनी, 'न्यायालय ही संस्था भरकटताना दिसत असेल, तर त्याविरोधात आवाज उठविणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे, मी चांगल्या भावनेने मत व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालय किंवा सरन्यायाधीशांच्या अवमानासाठी नाही, असे सांगितले. तसंच, माझे 'ट्वीट' प्रामाणिक विश्वासाचे प्रतिनिधित्व करतात. मी तेच विचार व्यक्त केले आहेत, ज्यावर मी कायम विश्वास ठेवतो. त्यामुळे, मी व्यक्त केलेल्या विचारांबद्दल शर्तीसह किंवा बिनशर्त माफी मागणे दांभिकपणाचे ठरेल, असे सांगत माफी मागण्यास नकार दिला होता. अखेर या प्रकरणी एक रुपया दंड ठोठावण्यात आला होता.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Prashant bhushan, Supreme court

    पुढील बातम्या