नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे. प्रशांत भूषण यांना न्यायालयानं 1 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड न भरल्यास त्यांना तीन महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा होणार असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.
हे प्रकरण भूषणच्या विद्यमान आणि माजी सरन्यायाधीशांबद्दलच्या वादग्रस्त ट्वीटबद्दल आहे. 14 ऑगस्ट रोजी या ट्वीटवरील प्रशांत भूषण यांचे स्पष्टीकरण कोर्टाने फेटाळले आणि त्यांना अवमान केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं. कोर्टाने भूषणला बिनशर्त माफी मागण्यासाठी वेळ दिला होता. मात्र प्रशांत भूषण यांना दंड अथवा शिक्षेला सामोरं जाईन पण माफी मागणार नाही अशी भूमिका स्वीकारली होती. त्यानंतर कोर्टानं त्यांना 1 रुपये दंड आकारला आहे.
Supreme Court imposes a fine of Re 1 fine on Prashant Bhushan. In case of default, he will be barred from practising for 3 years & will be imprisoned of 3 months https://t.co/0lMbqiizBb
प्रशांत भूषण यांनी, 'न्यायालय ही संस्था भरकटताना दिसत असेल, तर त्याविरोधात आवाज उठविणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे, मी चांगल्या भावनेने मत व्यक्त केले आहे. सुप्रीम कोर्ट किंवा सरन्यायाधीशांच्या अवमानासाठी नाही, असे सांगितले. तसेच, माझे 'ट्वीट' प्रामाणिक विश्वासाचे प्रतिनिधित्व करतात. मी तेच विचार व्यक्त केले आहेत, ज्यावर मी कायम विश्वास ठेवतो. त्यामुळे, मी व्यक्त केलेल्या विचारांबद्दल शर्तीसह किंवा बिनशर्त माफी मागणे दांभिकपणाचे ठरेल, असे सांगत माफी मागण्यास नकार दिला होता.