नवी दिल्ली 13 ऑगस्ट: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनकच असून मुखर्जी हे आता कोमात गेल्याची महिती डॉक्टरांनी दिली आहे. दिल्लीतल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुखर्जी यांच्यावर मेंदूची शस्रक्रिया झाली होती. त्यातच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने प्रकृती आणखीच खालावली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचं खास पथक त्यांच्यावर उपचार करत असून उपचारांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांची चिंता वाढली आहे.
प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीबाबत आज सोशल मीडियावर उलट सुलट बातम्या येत होत्या. हॉस्पिटल आणि मुखर्जी यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचं खंडण करण्यात आलं आहे.
The condition of former president Pranab Mukherjee remains unchanged and he is deeply comatose, the Army's Research and Referral hospital said on Thursday
84 वर्षांच्या मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांची खास टीम प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. मात्र कोविड आणि मेंदूच्या गाठीमुळे डॉक्टरांची काळजी वाढली आहे. राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.