Home /News /national /

प्रणवदांच्या मुलाचा TMC मध्ये प्रवेश, बहीण शर्मिष्ठांनी उघडपणे व्यक्त केला विरोध

प्रणवदांच्या मुलाचा TMC मध्ये प्रवेश, बहीण शर्मिष्ठांनी उघडपणे व्यक्त केला विरोध

भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिवंगत नेते प्रणव मुखर्जी यांचा पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी सोमवारी काँग्रेसला सोडचिठ्टी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

    कोलकाता, 5 जुलै : भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिवंगत नेते प्रणव मुखर्जी (Pranav Mukharjee) यांचा पुत्र अभिजीत मुखर्जी (Abhijeet Mukharjee) यांनी सोमवारी काँग्रेसला सोडचिठ्टी देत तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) अगोदरच डबघाईला आलेल्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. प्रणव मुखर्जींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी (Sharmishtha Mukharjee) यांनी भावाच्या या निर्णयाबद्दल दुःख होत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. असं व्यक्त केलं दुःख अभिजीत मुखर्जी यांनी सोमवारी काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केल्यानंतर शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केवळ दुःख होत असल्याचं म्हटलं आहे. अभिजीत मुखर्जींचं किंवा कुठल्याही पक्षाचं नाव न घेता, हे दुःखद आहे, एवढ्याच भावना त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केल्या. मात्र प्रणवदांच्या पश्चात त्यांच्या दोन मुलांमध्ये आलेला हा पक्षीय दुरावा बंगालमध्ये दिवसभऱ चर्चेचा विषय होता. भा दुपारी झाला पक्षप्रवेश कोलकात्यातील तृणमूल भवनमध्ये दुपारी 4 वाजता अभिजीत मुखर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी लोकसभेतील तृणमूल काँग्रेसचे सभागृह नेते सुदीप बंदोपाध्याय आणि मंत्री पार्थ चॅटर्जी उपस्थित होते. अभिजीत मुखर्जींच्या प्रवेशानं तृणमूल काँग्रेसची राज्यातील ताकद वाढणार असून प्रणव मुखर्जींच्या मुलाने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणे, या घटनेचं एक भावनिक मूल्यदेखील बंगालमधील जनतेसाठी असणार आहे. अभिजीत यांची कारकीर्द अभिजीत मुखर्जी हे 2012 आणि 2014 या दोन्ही वेळा काँग्रेसच्या तिकीटावर बंगालमधून खासदार म्हणून निवडून आले. जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून दोनदा निवडणूक जिंकणारे अभिजीत हे 2019 साली मात्र त्याच लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले. त्यानंतर त्यांचं पक्षातलं महत्त्व कमी होत गेल्याचं चित्र दिसू लागलं होतं. ममता बॅनर्जींनी ज्या पद्धतीनं भाजपला रोखलं, ते पाहून आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं मुखर्जी यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांचे हात मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध असून तृणमूलच्या वाढीसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांच्यापाठोपाठ अभिजीत मुखर्जी यांनीदेखील तृणमूलमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाची बंगालमधील ताकद चांगलीच वाढली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Congress, TMC, West bangal

    पुढील बातम्या