संघ तुमचा चुकीचा वापर करू शकतो, प्रणवदांना मुलीचा सल्ला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2018 03:02 AM IST

संघ तुमचा चुकीचा वापर करू शकतो, प्रणवदांना मुलीचा सल्ला

मुंबई, 06 जून : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उद्या गुरुवारी संघाच्या कार्यक्रमासाठी नागपुरात दाखल झाले आहे. पण तुम्ही सांभाळू राहा आणि संघ तुमचा चुकीचा वापर करू शकते असा सल्लाच प्रणवदांची कन्या आणि काँग्रेसच्या नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलाय.

प्रणवदा यांच्या नागपूर दौऱ्यामुळे शर्मिष्ठा या काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे शर्मिष्ठा चांगल्याच संतापल्यात. माझा काँग्रेसवर विश्वास आहे आणि त्यामुळेच मी काँग्रेसमध्ये आहे एकवेळ राजकारण सोडेन पण काँग्रेस पक्ष सोडणार नाही असं शर्मिष्ठा यांनी ठणकावून सांगितलं. आता तरी प्रणव मुखर्जी यांना भाजपचं घाणेरडे राजकारण कसं चालतं हे लक्षात आलं असेल असंही शर्मिष्ठा यांनी ट्विट केलं आहे.

Loading...

संघाला सुद्धा तुम्ही त्यांचे विचार आपल्या भाषणातून व्यक्त कराल असं वाटत नाही. पण तुमचं भाषण विसरलं जाईल आणि फक्त तिथले व्हिजुअल्स लक्षात राहतील आणि ते खोट्या मेसेजेसच्या माध्यमातून पसरवले जातील असंही शर्मिष्ठा यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2018 11:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...