प्रणवदांनी भाषणातून संघाला आरसा दाखवला,काँग्रेसची टीका

प्रणवदांनी भाषणातून संघाला आरसा दाखवला,काँग्रेसची टीका

  • Share this:

दिल्ली, 07 जून : प्रणव मुखर्जी यांचा संघाच्या कार्यक्रमात जाण्याचा निर्णय सार्थ ठरलाय. त्यांनी संघाला आरसा दाखवलाय अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी केलीये.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यांनी  संघाचा तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप सोहळ्याला हजेरी लावली. हा कार्यक्रम संपल्यानंतर सुरजेवाल यांन पत्रकार परिषद घेऊन प्रणवदांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली.

प्रणवदांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणे यावर वाद झाला. पण त्यांचा दौरा सार्थ ठरलाय ते जे बोलले ते काँग्रेसचे विचार होते. त्यांनी संघाच्या मुख्यालयात जाऊन संघाला आरसा दाखवलाय. भारताचा गौरवशाली इतिहास सांगितला. प्रणवदांनी मोदी सरकारला राज धर्म शिकवला अशी टीका सुरजेवालांनी केली.

संघाने आता आपली चूक स्वीकारण्यास तयार आहे का ?, दलित, महिला आणि अल्पसंख्याकांच्या विरोधातील भूमिका मागे घेण्यास तयार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.

हे पण वाचा

आधी संघाचं काम पाहा मग बोला -मोहन भागवत

धर्म कधी भारताची ओळख होऊ शकत नाही,संघाच्या मंचावर प्रणवदांची देशभक्ती

मोहन भागवत यांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे

डाॅ. हेडगेवार हे भारतमातेचे थोर सुपूत्र-प्रणव मुखर्जी

First published: June 7, 2018, 11:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading