BREAKING प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री, दोन जणांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार

BREAKING प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री, दोन जणांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार

सुदीन ढवळीकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तर सरदेसाई हे गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते आहेत.

  • Share this:

पणजी 18 मार्च :  प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. त्यांच्या नावाची थोड्याच वेळात औपचारिक घोषणा होणार आहे. तर उपमुख्यमंत्री पदावर दोघांची वर्णी लागणार आहे. सुदीन ढवळीकर आणि विजय सरदसाई हे उपमुख्यमंत्री असणार आहेत. आज रात्रीच हे सर्व नेते शपथ घेणार आहेत.

सुदीन ढवळीकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तर सरदेसाई हे गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते आहेत. प्रमोद सावंत हे गोवा विधानसभेचे सभापती आहेत. उत्तर गोव्यातल्या सॅनक्वलिम या विधानसभेच्या जागेवरून ते जिंकून आले आहेत.

गेल्या 24 तासांपासून मुख्यमंत्रीपदाच्या नावाबाबत चर्चा सुरू होती. मात्र त्यावर तोडगा निघत नव्हता. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मध्यरात्रीच पणजीत दाखल झाले होते. मात्र नावावर एकमत होत नव्हते. भाजपला पाठिंबा देणारे मित्रपक्ष राजी होत नसल्याने पेच वाढला होता.

प्रमोद सावंत हे मनोहर पर्रिकरांचे विश्वासू असल्याने त्यांचं नाव आघाडीवर होतं. तर भाजपची ही चर्चा सुरू असतानाच काँग्रेसनेही सस्ता स्थापनचा दावा केला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हेही गोव्यात अंत्यसंस्कारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर हालचाली वाढल्या.

शेवटी सोमवारी सायंकाळी मित्रपक्षांसोबत बैठक होऊन त्यात हा तोडगा काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गोव्याचं संख्याबळ 

एकूण जागा : 40

सध्याचे संख्याबळ - 36

भाजप : 12

मगोप - 3

गोवा फॉरवर्ड - 3

अपक्ष - 3

काँग्रेस आघाडी

काँग्रेस : 14

राष्ट्रवादी काँग्रेस- 1

First published: March 18, 2019, 7:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading