शाळांनी मदतीसाठी सरकारकडे भीक मागू नये - जावडेकरांच्या वक्तव्याने वाद

शाळांनी मदतीसाठी सरकारकडे भीक मागू नये - जावडेकरांच्या वक्तव्याने वाद

'शाळांनी निधीसाठी सरकारकडे भीक मागण्याऐवजी माजी विद्यार्थ्यांकडून मदत मागावी आणि स्वयंपूर्ण व्हावं'

  • Share this:

पुणे,ता.15 सप्टेंबर : शाळांनी निधीसाठी सरकारकडे भीक मागण्याऐवजी माजी विद्यार्थ्यांकडून मदत मागवी या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झालाय. सरकार मदत देते म्हणजे उपकार करते का असा सवाल आता विचारला जातोय. जावडेकरांनी शुक्रवारी पुण्यातल्या ज्ञानप्रबोधीनी शाळेला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले काही शाळांना सरकारकडे मदतीसाठी भीक मागण्याची सवय असते, सरकारकडे कटोरा घेऊन ते मदत मागतात. शाळांनी सरकारकडे मदत मागण्यापेक्षा आपल्या माजी विद्यार्थ्यांकडून मदत मागावी आणि स्वयंपूर्ण व्हावं.

अनुदानित शाळांनी खर्चासाठी सरकारकडे जायचं नाही तर कुणाकडे जायचं. सरकारही अनुदान देण्यासाठी विशिष्ट निधी बाजूला ठेवत असतं. त्यामुळे विद्येच्या मंदिराला जाहीरपणे कटोरा घेऊन जातात, असं म्हणणं किती योग्य आहे, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

दप्तराचं ओझं

प्रकाश जावडेकर म्हणाले विद्यार्थ्यांच्या फक्त पाठीवरून दफ्तराचे ओझे उतरवून चालणार नाही तर त्यांच्या मनावरचं ओझही कमी केलं पाहिजे. हे ओझं कमी करण्यासाठी सरकार त्यांच्या अभ्यासक्रमात 50 टक्क्यांनी कपात करणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली. खेळ, मूल्ये, कौशल्य विकास ,अनुभव यावर आधारित पाठ्यक्रम शिकवला जाणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

आठवीतल्या विद्यार्थ्याला 5 वीचे गणित सोडवता येत नाही किंवा भाषा विषय वाचता येत नाही हे चित्र बदलायाचे आहे तसेच चांगले शिक्षक तयार करायचे आहेत त्यासाठी सरकारने Assesment survey आणि Integrated BED कोर्सेस सारखी पावले उचलली आहेत अशी माहिती जावडेकर यांनी दिली

...आणि गणेशाच्या मंडपातच झालं नमाज पठण

First published: September 15, 2018, 2:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading