डार्विनच्या सिध्दांतावरून सत्यपालांची प्रकाश जावडेकरांनी केली कानउघडणी

डार्विनच्या सिध्दांतावरून सत्यपालांची प्रकाश जावडेकरांनी केली कानउघडणी

'वादग्रस्त विधानं करणं टाळा' असं जावडेकरांनी सत्यपालांना सांगितलं आहे.

  • Share this:

24 जानेवारी : केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांना त्यांच्या वरिष्ठ केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. 'वादग्रस्त विधानं करणं टाळा' असं जावडेकरांनी सत्यपालांना सांगितलं आहे.

मनुष्याच्या उत्क्रांतीबाबतचा डार्विनचा सिध्दांत जाहीर कार्यक्रमात सत्यपाल सिंह यांनी खोटा ठरवला होता. त्यांच्या या विधानावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे त्यांना समज देत सांभाळून बोला असं जावडेकर म्हणाले आहेत.

डार्विनचा सिध्दांत शाळा, कॉलेजांतून काढून टाका असं खळबळजनक विधान सत्यपाल यांनी केलं होतं. यावर प्रकाश जावडेकरांनी सत्यपाल सिंह यांची चांगलीच शाळा घेतली आहे. 'याबाबत मी सत्यपाल यांच्याशी चर्चा केली असून अशाप्रकारची विधानं करण्यापासून स्वत:ला परावृत्त करा, अशी सूचना मी त्यांना केली आहे. शास्त्रीय बाबींमध्ये आपण ढवळाढवळ करण्याची गरज नाही, असा सल्लाही मी त्यांना दिला आहे.'

चार्ल्स डार्विनची उत्क्रांतीची थिअरी चुकीची आहे. वानरापासून माणूस बनण्याची प्रक्रिया कुणी पाहिली आहे का? डार्विनला चुकीचं ठरवण्यासाठी लवकरच एक मोठी परिषद भरवू. असं सिंह म्हणाले होते. पण त्यावरही जावडेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'अशी कोणतीही परिषद भरवण्याचा आमचा विचार नाही आहे. असं जावडेकरांनी स्पष्ट केलं आहे.'

First published: January 24, 2018, 10:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading