Home /News /national /

PMGKAY: मोदी सरकारचा मोठा निर्णय, सप्टेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना मिळणार 5 किलो मोफत रेशन

PMGKAY: मोदी सरकारचा मोठा निर्णय, सप्टेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना मिळणार 5 किलो मोफत रेशन

केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) म्हणजेच PMGKAY चा कालावधी सहा महिन्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सप्टेंबर 2022 पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 26 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narenda Modi) यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) म्हणजेच PMGKAY चा कालावधी सहा महिन्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सप्टेंबर 2022 पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे. ही योजना 31 मार्च रोजी संपत होती सन 2020 पासून केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत रेशन दिले जात आहे. मार्च 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करण्यात आली. सुरुवातीला ही योजना एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु नंतर ती 30 नोव्हेंबर 2021 आणि 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली. अनुदानित अन्नधान्याव्यतिरिक्त मोफत रेशन दिलं जातं PMGKAY अंतर्गत, 80 कोटींहून अधिक लोकांना दरमहा 5 किलो धान्य दिले जात आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) 80 कोटी शिधापत्रिकाधारकांची मोफत रेशनसाठी ओळख पटवण्यात आली आहे. त्यांना रेशन दुकानांमधून वितरीत करण्यात येणाऱ्या अनुदानित धान्याव्यतिरिक्त मोफत रेशन दिलं जातं. हे वाचा - योगींच्या मंत्रिमंडळात एकमेव मुस्लीम चेहरा; भाजपनं असं जुळवून आणलंय जातीचं गणित ही योजना फक्त शिधापत्रिकाधारकांपुरती मर्यादित आहे PMGKAY अंतर्गत मोफत अन्नधान्याचा लाभ ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांना नाही. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही शिधापत्रिका धारकांपुरती मर्यादित आहे. म्हणजेच, देशातील ज्या नागरिकाकडे शिधापत्रिका उपलब्ध आहे, त्यांना त्यांचा रेशनचा कोटा तसेच या योजनेअंतर्गत अतिरिक्त रेशन मिळत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Modi government, Narendra modi

    पुढील बातम्या