• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • राजधानी दिल्लीवर वीज कपातीचं महासंकट? कोळशाच्या तुटवड्यामुळे प्रशासन चिंतेत

राजधानी दिल्लीवर वीज कपातीचं महासंकट? कोळशाच्या तुटवड्यामुळे प्रशासन चिंतेत

देशाची राजधानी दिल्लीत वीज संकट निर्माण झाल्याचा संदेश टाटा पॉवरने दिल्लीतील ग्राहकांना पाठवला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर: देशाची राजधानी दिल्लीत वीज संकट निर्माण (electricity crisis in delhi) झाल्याचा संदेश टाटा पॉवरने दिल्लीतील ग्राहकांना पाठवला आहे. टीपीडीडीएलनं सांगितलं की, दिल्लीला वीज पूरवठा करणाऱ्या वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण (shortage of coal in power plant) झाला आहे. त्यामुळे दुपारी 2 ते सायंकाळी 6 पर्यंत दिल्लीत नागरिकांना वीज कपातीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे एक जबाबदार नागरिक बनून संयम राखा, अशा आशयाचा संदेश पाठवण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीतील वीज ग्राहकांसोबत प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, दिल्लीतील संभाव्य वीज संकटाबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पत्र लिहिलं. तसेच दिल्लीच्या ऊर्जामंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तसेच त्यांनी वीज पुरवठा करणाऱ्या 3 कंपन्यांसोबत संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेतली आहे. यावेळी ते म्हणाले की दिल्लीत विजेचं संकट नाही. हेही वाचा-भारताच्या Coaching city मध्ये तयार होतंय भन्नाट सॅटेलाईट Railway Station दिल्लीच्या ऊर्जा मंत्रालयाच्या मते, कोळशाचा अभाव फक्त केवळ दिल्लीतच आहे, असं नाही. उत्तर भारतात अनेक ठिकाणी कोळशाचा तुटवडा जाणवत आहे. सध्या दिल्लीत विजेचं संकट नाही. दिल्लीचे ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. हेही वाचा-भारतात दमा आणि डोळ्यांचे आजार पसरवण्यासाठी चीनने बनवले खास फटाके? भारतात वीज संकटाचा धोका? देशात एकूण 135 वीज निर्मिती केंद्र कोळशावर चालणारी आहेत. यातील 107 वीज निर्मिती केंद्रात फक्त 5 दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. तर अन्य 28 वीज निर्मिती केंद्रात फक्त 2 दिवस पुरेल इतका कोळसा आहे. खरंतर, कोळसा उत्पादनाच्या बाबतीत भारत हा जगातील चौथा प्रमुख देश आहे. पण यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारतात सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे भारतातील अनेक कोळसा खाणीत पाणी शिरलं आहे. त्यामुळे बरेच दिवस तेथील खाणकाम बंद होतं. त्यामुळे भारतातील वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: