S M L
Football World Cup 2018

आमच्या अवघड प्रश्नांना घाबरून भाजपने अधिवेशन पुढे ढकललं-राहुल गांधी

भाजप जे सांगतंय ते गुजरात माॅडेल नसून मोदी-रुपानी माॅडेल आहे अशी टीकाही राहुल यांनी केली.

Sachin Salve | Updated On: Nov 25, 2017 05:29 PM IST

आमच्या अवघड प्रश्नांना घाबरून भाजपने अधिवेशन पुढे ढकललं-राहुल गांधी

25 नोव्हेंबर : गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला अवघड प्रश्न विचारले जाऊ नयेत म्हणून संसदेचं हिवाळी अधिवेशनाला उशीर केला जातोय असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी केला.

काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी आज गुजरातच्या गांधीनगर इथल्या दाहेगाममध्ये निवडणूक प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.  संसदेत आम्ही भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहा याची संपत्ती तीन महिन्यात ५० हजारांवरुन ८० कोटी कशी झाली तसंच राफेल विमान खरेदीतला बदल कोणत्या उद्योगपतीसाठी झाला हे प्रश्न विचारणार असल्यानेच संसदेचं हिवाळी अधिवेशन गुजरात निवडणुकांनतर ठेवण्यात आलं असल्याची टीका राहुल यांनी केली.

भाजप जे सांगतंय ते गुजरात माॅडेल नसून मोदी-रुपानी माॅडेल आहे अशी टीकाही राहुल यांनी केली. काही ठराविक उद्योगपतींसाठी हे सरकार काम करतंय असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2017 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close