S M L

रॉबर्ट वाड्रा यांचा राजकारणात प्रवेश?; दिल्लीतील पोस्टरबाजीची देशभरात चर्चा

News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2019 10:39 AM IST

रॉबर्ट वाड्रा यांचा राजकारणात प्रवेश?; दिल्लीतील पोस्टरबाजीची देशभरात चर्चा

नवी दिल्ली, 06 फेब्रुवारी: आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रियांका गांधी यांना मैदानात उतरवले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपवली आहे. प्रियांका यांची नियुक्ती झाल्यानंतर अनेक राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. प्रियांका कुठे सभा घेणार, कुठे रॅली करणार याबद्दल विविध तर्क लढवले जात आहेत. त्याच बरोबर प्रियांका यांचे अभिनंदन करणारे पोस्टर उत्तर प्रदेश, दिल्लीसह संपूर्ण देशात लावण्यात आले आहेत. अशाच एका पोस्टरकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. लक्ष वेधण्याचे कारण म्हणजे पोस्टवर लावण्यात आलेले त्याच राहुल आणि प्रियांका यांच्या सोबत चक्क रॉबट वाड्रा यांचा देखील फोटो आहे.

VIDEO : भावाच्या शेजारी बहिणीची केबिन, असं प्रियांकांचं आॅफिस

नवी दिल्लीत लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये वाड्रा यांच्या फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. प्रियांका यांच्या थेट राजकीय प्रवेशासोबत मागील दरवाज्यातून वाड्रा यांचा देखील राजकीय प्रवेश झाला नाही ना अशी चर्चा अनेक जण करत आहेत. पोस्टरमध्ये कट्टर सोच नहीं युवा जोश असे म्हटले आहे. त्याखाली राहुल, प्रियांका आणि वाड्रा यांचे फोटो आहेत. फोटोच्या खाली जन-जन की है, यही पुकार राहुल जी-प्रियंकाजी अबकी बार अशा ओळी लिहण्यात आल्या आहेत.


लोकसभा 2019: प्रियांका गांधी महाराष्ट्रातून प्रचाराचा नारळ फोडणार?

2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव झाला होता. त्यामुळेच यंदा काँग्रेस राहुल यांच्यासोबत प्रियांका गांधी यांना मैदानात उतरवत आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा या जोडीला टक्कर देण्यासाठी प्रियांका सक्षम असल्याचे काँग्रेस नेत्यांचे मत आहे. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत प्रियांका या काँग्रेसच्या स्टार प्रचारक असणार आहेत. पण दिल्लीतील पोस्टरमुळे वाड्रा यांचा देखील राजकीय प्रवेश होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे वाड्रा यांच्यावरून भाजप आणि अन्य विरोधी पक्षांनी काँग्रेसवर नेहमीच टीका केली आहे. आता पोस्टरमध्ये वाड्रा यांना मिळालेले स्थान प्रत्यक्षात पक्षात देखील मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


Loading...

राजकीय फायद्यासाठी प्रियांका गांधींवर झाली सर्जरी, या बातमीत तथ्य किती?VIDEO: मोदींना अशीही टक्कर, 'अपनी बात राहुल के साथ'मध्ये तुमचं स्वागत


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2019 10:39 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close