मोदी 'रावण', राहुल गांधी 'राम'; काँग्रेस कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी

मोदी 'रावण', राहुल गांधी 'राम'; काँग्रेस कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी

राहुल गांधी यांच्या भोपाळ दौऱ्यादरम्यान काँग्रेसनं केलेली पोस्टरबाजी बुमरँग झाल्याचं चित्र पाहायाला मिळालं.

  • Share this:

भोपाळ, सोनिया राणा 8 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप - प्रत्यारोपांची लढाई रंगली आहे. पोस्टर, घोषणा, सोशल मीडियाच्या माध्यमातून परस्परांवर टीका करण्याची एकही संधी दोन्ही पक्ष सोडताना दिसत नाहीत. दरम्यान, अशाच प्रकारे राहुल गांधी यांच्या भोपाळ दौऱ्यादरम्यान काँग्रेसनं केलेली पोस्टरबाजी बुमरँग झाल्याचं चित्र पाहायाला मिळालं. राहुल गांधी सध्या भोपाळ दौऱ्यावर असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'रावण' तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना 'रामा'च्या भूमिकेत दाखवलं. पण, हे पोस्टर काँग्रेसवर बुमरँग झालं. त्यावर टीका देखील झाली. अखेर, पंतप्रधान नरेंद्र मोदींना रावण दाखवलेलं ते पोस्टर काढण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढावली. शिवाय, 'चौकीदार ही चोर है' अशी घोषणा देखील या पोस्टरवर लिहिण्यात आली होती.

यानंतर, 'काँग्रेस शिस्तप्रिय असा पक्ष आहे. कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात बॅनरबाजी केली',असं स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रवक्ते पीसी शर्मा यांनी दिलं आहे. दरम्यान, पंतप्रधानांना रावणाच्या रूपाच दाखवणं किती योग्य? असा सवाल सध्या विचारला जात आहे.

आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी

निवडणुका तोंडावर आल्यामुळे आता काँग्रेस - भाजपमध्ये जोरदार आरोप - प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजपकडून देखील काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी लोकसभेतील भाषणादरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल चढवला. 'ते तुम्ही 55 वर्षात करू शकला नाहीत, त्या गोष्टी आम्ही 55 महिन्यांमध्ये केल्या', अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. गुरूवारी लोकसभेत झालेलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण हे लोकसभा निवडणुकांपूर्वीचं शेवटचं भाषण होतं.

VIDEO : राहुल गांधी म्हणतात.. 'राफेल'मध्ये मोदींचा प्रत्यक्ष सहभाग'; UNCUT पत्रकार परिषद

First published: February 8, 2019, 1:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading