मोदी सरकारने रोजगार अहवाल रोखला; NSCच्या दोघा सदस्यांनी दिला राजीनामा

मोदी सरकारने रोजगार अहवाल रोखला; NSCच्या दोघा सदस्यांनी दिला राजीनामा

रोजगार आणि बेरोजगारी संदर्भातील सर्वेक्षण अहवाल रोखल्याने राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या (NSC)दोघा सदस्यांनी राजीनामा दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जानेवारी: राष्ट्रीय सर्वेक्षण संघटना अर्थात NSSOकडून तयार करण्यात आला रोजगार आणि बेरोजगारी संदर्भातील सर्वेक्षण अहवाल रोखल्याने राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या (NSC)दोघा सदस्यांनी राजीनामा दिला आहे. NSSOने अहवाल तयार होऊन दोन महिने झाले तर अद्याप सरकारने तो जाहीर केला नाही. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे सदस्य पी.सी.मोहनन आणि जे.व्ही.मीनाक्षी यांनी राजीनामा दिला आहे.

मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा NSSOचा पहिला अहवाल आहे. यात नोटाबंदीनंतर किती लोकांचा रोजगार गेला आणि त्यानंतर रोजगार निर्मितीमध्ये घट झाल्याची माहिती असल्याचे वृत्तात म्हटले आहे. विशेष म्हणजे राजीनामा दिलेल्यापैकी मोहनन हे NSCचे कार्यकारी अध्यक्ष देखील होते. या दोन सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता NSCमध्ये केवळ दोनच सदस्य राहिले आहेत. त्यात मुख्य सांख्यिकी अधिकारी प्रवीण श्रीवास्तव आणि नीति आयोगाचे सीईओ अभिताभ कांत यांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून आयोग पूर्वी सारखा सक्रिय नाही. तसेच आयोगाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास सक्षम नसल्याचे आम्हाला वाटते, असे मोहनन यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. सात सदस्यांच्या NSCमध्ये याआधीपासूनच 3 पद रिक्त आहेत. आता दोघांनी राजीनामा दिल्यामुळे दोनच सदस्य शिल्लक आहेत. राजीनामा दिलेल्या मोहनन आणि मीनाक्षी यांचा कार्यकाळ जून 2020मध्ये संपुष्ठात येणार होता.

याआधी झालेल्या सर्व्हेमध्ये नोटाबंदीमुळे रोजगार निर्मितीवर परिणाम झाल्याचे म्हटले होते. ऑटोमोबाईल, टेलिकॉम, एअरलाइन्स, बांधकाम या क्षेत्रावर सर्वात जास्त परिणाम झाला असून बेरोजगारीने गेल्या 4 वर्षातील विक्रम मोडल्याचे या सर्व्हेतून समोर आले होते.

भरधाव टेम्पोने बाइकस्वाराला उडवलं; पाहा मृत्यूचा थरारक VIDEO

First published: January 30, 2019, 12:43 PM IST

ताज्या बातम्या