लोकसभा निवडणुकीची मार्चमध्ये घोषणा होण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीची मार्चमध्ये घोषणा होण्याची शक्यता

फेब्रुवारी अखेरपर्यंत तयारी करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्याच्या निवडणूक आयोगांना आदेश दिले आहे

  • Share this:

प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी

18 जानेवारी : आगामी लोकसभा निवडणूक 2019 ची मार्चच्या पहिल्या आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत तयारी करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्याच्या निवडणूक आयोगांना आदेश दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू आहे. तर लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्या आहे. भाजप-शिवसेनेत युतीची आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीची चर्चा सुरू आहे.

शिवसेनेनं आधीच स्वबळाचा नारा दिला आहे. तर भाजपकडून युतीसाठी मनधरणी सुरू आहे. अशातच निवडणूक आयोगाने एकत्र निवडणूक घेण्याच्या शक्यता वर्तवली होती.

जर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र, झाल्या तर राज्याचे राजकारण ढवळून निघेल. दोन्ही निवडणूक एकत्र झाल्या तर शिवसेनेला याचा फायदा होईल, भाजपला नमतं घेऊन सेनेला जास्त जागा द्याव्या लागतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

====================

First published: January 18, 2019, 6:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading