मुंबई, 8 एप्रिल : एचआयव्ही पॉझिटिव्ह (HIV Positive) रुग्णांना काही वर्षापूर्वी मिळणारी वागणूक आणि सध्याची परिस्थिती यात खुप बदल झाला आहे. स्पर्शाने एचआयव्ही पसरत नाही याबाबत सरकार, सामाजिक संस्था यांनी केलेल्या जनजागृतीचा परिणाम हळूहळू दिसू लागला आहे. त्यातही एचआयव्ही बाधितांना नोकरी मिळणे खूप कठीण आहे. अशा काही संस्था आणि संघटना आहेत, ज्या या लोकांच्या कल्याणासाठी कार्य करतात. असाच एक कॅफे कोलकात्यात (Kolkata) उघडण्यात आला आहे. विशेष म्हणजे येथे काम करणारे सर्व कर्मचारी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. एचआयव्ही पॉझिटिव्ह स्टाफद्वारे चालवले जाणारे हे आशियातील पहिले कॅफे आहे.
दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार याला 'कॅफे पॉझिटिव्ह' (Cafe Positive) असे नाव देण्यात आले आहे. एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांसाठी जागरुकता निर्माण करणे आणि रोजगार निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. हा कॅफे आनंदघर स्वयंसेवी संस्था चालवते. कल्लोल घोष यांनी त्याची स्थापना केली आहे. ही एनजीओ अपंग मुले आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांसाठी काम करते.
भारतात अति-गरिबी संपली आहे का? IMF अहवालातील संकेत, जाणून घ्या अधिक माहिती
फ्रँकफर्टच्या कॅफेने प्रेरित
कल्लोल घोष (Kallol Ghosh) यांनी याबाबत सांगितले की, त्यांना फ्रँकफर्टमधील एका कॅफेपासून प्रेरणा मिळाली, जी पूर्णपणे एचआयव्ही पॉझिटिव्ह लोक चालवतात. हे ठिकाण कॉफी आणि सँडविचसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बहुतांश वेळा नोकरदार लोकांची व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी असते.
अशा पद्धतीनं भारतातही होऊ शकते वीजनिर्मिती, आनंद महिंद्रांनी शेअर केला Video
अशाप्रकारे 30 कॅफे उघडण्याची योजना
कल्लोल घोष सांगतात की भारतात असे 30 कॅफे उघडण्याची त्यांची योजना आहे. अशा परिस्थितीत त्यांनी प्रशिक्षणासाठी 800 जणांची निवड केली आहे. सुरुवातीला कॅफे उघडताना तो चालणार नाही अशी भीती होती. मात्र, आता लोक यायला लागले आहेत. येथे काम करणारे लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे कळल्यावर काही राहतात तर काही निघून जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.