Home /News /national /

Tunnel Collapsed In JK: खूनी नाल्याजवळ बचाव मोहिमेदरम्यान दरड कोसळली; थरकाप उडवणार व्हिडीओ

Tunnel Collapsed In JK: खूनी नाल्याजवळ बचाव मोहिमेदरम्यान दरड कोसळली; थरकाप उडवणार व्हिडीओ

Jammu and Kashmir : रामबनमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील मेकरकोट भागात बचाव कार्याच्या जागेजवळ डोंगराचा एक भाग कोसळला. रामबनचे उपायुक्त आणि डीडीसी मसरतुल इस्लाम म्हणाले की, आमच्या 2-3 मशीन्स गुंतल्या होत्या, आम्ही खूप काळजीपूर्वक काम करत होतो, काल रात्री जे पडलं त्यापेक्षा आज मोठा भाग कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुढे वाचा ...
    श्रीनगर, 20 मे : रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील एका बांधकामाधीन बोगद्याच्या जागेवर ताज्या भूस्खलनामुळे बचावकार्य थांबवण्यात आले आहे. जवळच्या डोंगराचा एक भाग कोसळल्याने बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पावसामुळे दरड कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नऊ कामगारांना वाचवण्यासाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) कडून ऑपरेशन सुरू होते. दुपारी 4.40 वाजताच्या सुमारास घटनास्थळी नवीन भूस्खलन आणि पावसामुळे बचावकार्य थांबवण्यात आले आहे. ITBP च्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, दरड कोसळल्याने बचाव कार्यकर्ते आणि मशीन्सना थांबवण्यास भाग पडल्यामुळे अनेक वेळा बचाव कार्य थांबवण्यात आले आहे. रस्त्यावरील पडलेले अवाढव्य ढिगारे दूर करण्यासाठी अर्थमूव्हर्सचा वापर केला जात आहे. या घटनेच्या व्हिडिओमध्ये बांधकामाधीन जागेजवळ डोंगराचा एक भाग कोसळताना दिसत आहे, जेथे बचाव कार्य सुरू होते. रामबनचे उपायुक्त मसरतुल इस्लाम यांनी सांगितले की, डोंगराची नवीन पडझड अनपेक्षित होती आणि बचाव कार्याला सुमारे 17 तासांनी धक्का बसला. “आम्हाला असे काही अपेक्षित नव्हते (मेकरकोटमधील डोंगराचा भाग कोसळणे). दोन मशीन अडकल्या. वादळामुळे बचाव कार्यावर परिणाम झाला आणि ऑपरेशनचे 16-17 तास वाया गेले. घटनेचे नव्याने मूल्यांकन करावे लागेल," दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले की, स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) च्या पथके घटनास्थळी उपस्थित आहेत. गुरुवारी रात्रीचा अपघात गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. रामबन जिल्ह्यातील मेकरकोट भागात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाजवळ खूनी नाला बोगदा बांधला जात आहे. बोगदा कोसळताच येथे उभी असलेली मोठी बांधकाम यंत्रेही त्याच्या कचाट्यात आल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर लगेचच पोलीस आणि लष्कराने संयुक्त बचाव मोहीम सुरू केली. या अपघातात बोगद्यासमोर उभी असलेली वाहने, बुलडोझर, ट्रक यांसह अनेक मशिनचेही नुकसान झाले आहे. जखमी मजुरांमध्ये विष्णू गोला (33) रा. झारखंड आणि अमीन (26) रा. जम्मू-काश्मीर यांचा समावेश आहे. डीसी रामबन, एनएचएआयचे प्रकल्प संचालक, डीआयजी आणि एसएसपी रामबन घटनास्थळी उपस्थित आहेत. ढिगाऱ्यात सुमारे 10 मजूर अडकले केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी रामबन आणि रामसू दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील एका बांधकामाधीन बोगद्याचा एक भाग कोसळण्याची घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मी डीसी (उपायुक्त) मसरतुल इस्लाम यांच्या सतत संपर्कात आहे. ढिगाऱ्याखाली सुमारे 10 मजूर अडकले आहेत. अन्य दोन जण जखमी अवस्थेत बचावले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य जोरात सुरू आहे. नागरी प्रशासन आणि पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. बंगालचे हे लोक बोगद्यात अडकले आहेत जादव रॉय (23), गौतम रॉय (22), सुधीर रॉय (31), दीपक रॉय (33) आणि परिमल रॉय (38), शिवा चौहान (26) अशी या बोगद्यात अडकलेल्यांची नावे आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर नवराज चौधरी (26) आणि कुशी राम (25) नेपाळमधील आणि मुझफ्फर (38) आणि इसरत (30) हे जम्मू-काश्मीरचे रहिवासी आहेत. ते म्हणाले की रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये झारखंडमधील विष्णू गोला (33) आणि जम्मू-काश्मीरमधील अमीन (26) यांचा समावेश आहे. जखमी तिसऱ्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही ते म्हणाले की, तिसर्‍या व्यक्तीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्यात आले आहे, मात्र, त्याची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. बोगद्याचे ऑडिट करणाऱ्या कंपनीने या सर्व मजुरांची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले. रामबनचे उपायुक्त मसरतुल इस्लाम आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक मोहित शर्मा यांच्यासह पोलिस उपमहानिरीक्षक घटनास्थळी उपस्थित असून बचाव कार्यावर देखरेख करत आहेत.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Jammu and kashmir

    पुढील बातम्या