• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ऑनलाइन क्लासदरम्यान वाजतं अश्लिल गाणं, वल्गर कमेंट आणि छळ; महिला शिक्षिका त्रस्त

ऑनलाइन क्लासदरम्यान वाजतं अश्लिल गाणं, वल्गर कमेंट आणि छळ; महिला शिक्षिका त्रस्त

एका शिक्षिकेने सांगितलं की, ऑनलाइन क्लास घेत असताना अचानक अनोळखी चेहरा समोर आला आणि आपले प्रायव्हेट पार्ट्स दाखवू लागला.

 • Share this:
  लखनऊ, 21 सप्टेंबर : देशात आजपासून अनेक राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र उत्तर प्रदेशासह अनेक राज्यांमध्ये विद्यार्थी ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून शिकत आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये तसं ऑनलाइन क्लासेस घेणं हे साधारण झालं आहे. महिला शिक्षकांसाठी मात्र ही डोकेदुखी ठरतं आहे. क्लासदरम्यान सेक्शुअल हरॅसमेंट, बुलिंग यांसारख्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. रात्री उशिरा विद्यार्थ्यांचे कॉल येत असतात त्याशिवाय अनोखळी आयडीवरुन अश्लिल संदेश पाठविले जातात. मस्तीमजेसाठी अनोळखींसोबत व्हिडीओ सेशन लिंक शेअर करण्यापासून अशी अनेक उदाहरणे आहे. यामुळे ऑनलाइन क्लास घेणाऱ्या महिला शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. क्लासदरम्यान अश्लिल गाणं मुंबईत गणिताच्या शिक्षिका दीपिका जैन (नाव बदलले आहे) या 6 वीच्या वर्गातील मुलांचा व्हिडीओ क्लास घेत होत्या. यादरम्यान एका विद्यार्थ्याने अश्लिल गाणं सुरू केलं. दीपिका म्हणतात, की वॉर्निंग देऊनही काही परिणाम झाला नाही. त्याशिवाय यामागे कोण आहे याची माहितीही मिळू शकत नव्हती. अख्खा वर्ग हसत होता. हे ही वाचा-बापाला हवा मुलगा; बाळाचे लिंग पाहण्यासाठी गर्भवती पत्नीचं पोटच कापलं अनोखळींना पाठवलं जातं ऑनलाइन क्लासेसचे लिंक उत्तर प्रदेशातील एका खासगी शाळेत इंग्रजी शिवकणाऱ्या गुंजन शर्मा (नाव बदललं आहे) यांनी सांगितलं की, ऑनलाइन क्लास घेत असताना अचानक अनोळखी चेहरा समोर आला आणि आपले प्रायव्हेट पार्ट्स दाखवू लागला. शिक्षिकेने सांगितले की, आम्हाला शंका आहे की कोणीतरी ऑनलाइन क्लासची लिंक दुसऱ्या कोणाला तरी शेअर केली असावी. शिक्षिकेला पाठवला शिव्यांचा मॅसेज या घटनेनंतर क्लास एक महिन्यांसाठी संस्पेंड करण्यात आला होता आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना आपला फोटो आणि संपूर्ण नावासह अकाऊंट अपडेट करण्यास सांगण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील 1170 शाळांचे प्रिन्सिपल आणि व्यवस्थापन संघटनेच्या सचिव केसरवानी सांगतात की, विद्यार्थ्यांमध्ये जागृतीची मोहीम चालवली जात आहे. आम्हाला शाळांतील उपद्रवी विद्यार्थ्यांना काढून टाकण्याचा सल्ला दिला जात आहे. याशिवाय शाळांमध्ये पालकांना बोलावून तक्रार करणे आणि पोलिसांपर्यंत हे प्रकरण घेऊन जाण्याबाबत सांगितले जात आहे. मात्र शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार यातून समस्या संपणार नाही. ऑनलाइन क्लासमध्ये खऱ्या गुन्हेगाराला पकडणं सोपं नाही. अनेकदा सहकार्य न करणारे पालक समस्या वाढवतात. अनेकदा ऑनलाइन क्लासदरम्यान पालक कमेंट करताना दिसतात. अनेकदा कॅमेराच्या समोर शॉर्टमध्ये फिरताना दिसतात.

  Published by:Meenal Gangurde
  First published: