धक्कादायक: आणखी एका फायनान्स कंपनीचा ग्राहकांना 2 हजार कोटांचा गंडा, मालक फरार!

धक्कादायक: आणखी एका फायनान्स कंपनीचा ग्राहकांना 2 हजार कोटांचा गंडा, मालक फरार!

एप्रिल महिन्यांपासून या कंपनीने आपल्या ग्राहकांना व्याज दिलेलं नाही. सुरुवातीला कंपनीने कोरोना आणि लॉकडाऊनचं कारण दिलं.

  • Share this:

नवी दिल्ली 28 ऑगस्ट: देशात ग्राहकांना फसविणाऱ्या अनेक कंपन्यांचं पितळ आत्तापर्यंत उघडं पडलं आहे. मात्र येवढ्या मोठ्या घटनानंतरही फसवणुकीचे प्रकार पुन्हा पुन्हा घडत असल्याचं दिसत आहे. आता केरळच्या एका फायनान्स कंपनीने ग्राहकांना 2 हजार कोटींचा गंडा घातला आहे. या कंपनीचा मालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहूल चोक्सी यांनी हजारो कोटींनी बँकांना फसवून पळ काढला होता.

केरळमधली Popular Financeया कंपनीमध्ये हा प्रकार घडला असून कंपनीचे संचालक थॉमस डॅनियल रॉय आणि प्रभा हे फरार आहेत. केरळमधल्या पथनमथिता जिल्ह्यात या कंपनीचं मुख्यालय आहे. आता पोलिसांनी त्या दोघांविरोधातही लुक आऊट नोटीस जारी केली आहे.

एप्रिल महिन्यांपासून या कंपनीने आपल्या ग्राहकांना व्याज दिलेलं नाही. सुरुवातीला कंपनीने कोरोना आणि लॉकडाऊनचं कारण दिलं. नंतर मात्र ग्राहकांना आपण फसवल्या गेल्याचं लक्षात यायला लागलं. जेव्हा या प्रकरणी लोकांनी मोठ्या प्रमाणावर जाब विचारायला सुरुवात केल्यावर कंपनीचे संचालक आणि मालकच फरार असल्याचं लक्षात आलंय.

‘फक्त माझं बाळ वाचवा’!  महापुरातून  नवजात बाळ आणि आईची थरारक सुटका; पाहा VIDEO

या कंपनीमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त जणांनी आपले पैसे गुंतवले आहेत. त्यात 10 हजारांपासून ते काही लाखांपर्यंतची रक्कम आहे. यात अनेक निवृत्तीधारकांनी आपल्या म्हातारपणाची सोय म्हणून पैसे गुंतवले होते. व्याजावर आपला उदनिर्वाह चालेल असं त्यांना वाटलं होतं. मात्र आता त्यांच्या रोजी-रीटीचाच प्रश्न निर्माण झाला असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करून पैसे मिळवून द्यावेत अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 28, 2020, 7:21 PM IST

ताज्या बातम्या