VIDEO : भारतीय गाडीची सर अलिशान गाड्यांना नाही, पोप बसले 'या' कारमध्ये

VIDEO : भारतीय गाडीची सर अलिशान गाड्यांना नाही, पोप बसले 'या' कारमध्ये

पोप फ्रान्सिस यांच्या ताफ्यात अनेक अलिशान, महागड्या गाड्या आहेत. तरीही त्यांनी भारतीय कंपनी महिंद्राच्या कारमधून प्रवास केला.

  • Share this:

मुंबई, 11 सप्टेंबर : पोप फ्रान्सिन यांच्या ताफ्यात अनेक लक्झरी गाड्या आहेत. मात्र त्यांनी अलिशान गाड्या सोडून एका भारतीय बनावटीच्या कारमधून फेरफटका मारला. महिंद्रा कंपनीच्या KUV100 मधून ते राजधानीत फिरले तेव्हाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक पवन गोयंका यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

पवन गोयंका यांनी ट्विट करून सांगितलं की, महिंद्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की मोजाम्बिक मध्ये फिरण्यासाठी पोप फ्रान्सिस यांनी KUV 100 गाडीचा वापर केला. त्यांच्याकडे अनेक महागड्या आणि लक्झरी गाड्या होत्या. पण फ्रान्सिस यांनी KUV 100 मधून फेरफटका मारला.

गोयंका यांनी एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे. यामध्ये मोजाम्बिक दौऱ्यावर पोप फ्रान्सिस कारमधून लोकांना हात दाखवताना दिसत आहे.

गेल्या आठवड्यात महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यात KUV 100 या कारचा वापर पोप फ्रान्सिस यांनी केल्याचंही त्यांनी सांगितलं. यासोबतच काही जुने फोटोही शेअर केले आहेत. 1964 मध्ये जेव्हा पोप मुंबईत Eucharistic Congress आले होते तेव्हा ओपन टॉप महिंद्रा यूव्हीमधून प्रवास केला होता. ती गाडी आजही म्यूझियममध्ये आहे. आता KUV सुद्धा या त्यासोबत ठेवण्यात येईल असं आनंद महिंद्रा यांनी सांगितलं.

VIDEO : भाजप प्रवेशाआधी हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा बोलून दाखवली मनातील खदखद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 04:40 PM IST

ताज्या बातम्या