Home /News /national /

"आम्हाला तुमच्याकडून माहिती हवी आहे", नितीन गडकरींना सरन्यायाधिशांनी सुप्रीम कोर्टात बोलावलं

"आम्हाला तुमच्याकडून माहिती हवी आहे", नितीन गडकरींना सरन्यायाधिशांनी सुप्रीम कोर्टात बोलावलं

'मंत्र्यांना बोलावणं हे फक्त माहिती घेण्यासाठी आहे. त्यांना हजर राहण्याचे आदेश आम्ही दिलेले नाहीत.'

  नवी दिल्ली 19 फेब्रुवारी : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे कायम इनोव्हेशन आणि अत्याधुनिक नवं तंत्रज्ञान याची चर्चा करत असतात. त्यांच्या या कामाची सगळ्याच व्यासपीठावर चर्चाही होते. आता सुप्रीम कोर्टानेच गडकरींच्या या कामाची दखल घेतलीय. याआधी अनेक व्यासपीठांवरही त्यांच्या या उपक्रमांची दखल घेतली गेलीय. गडकरींना त्याच कारणांसाठी कोर्टाने खास सुप्रीम कोर्टात बोलवालं आहे. गडकरींना बोलावण्यावरून सरकारी वकिलांनी आक्षेपही घेतला होता. मात्र सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी त्यावर खुलासा करत नेमकं कारण सांगितलं. प्रदुषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कालबद्ध कार्यक्रम आखावा यासाठी सुप्रीम कोर्टात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. त्याची सुनावणी कोर्टात सुरू आहे. त्यावर बोलताना सरन्यायधीश म्हणाले, यावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे कायम बोलत असतात. आम्हीही त्यांची मतं माध्यमातून ऐकली आहेत. त्यामुळे त्यांनीच कोर्टात येऊन आम्हाला माहिती द्यावी. सरन्यायाधीशांच्या या मताला सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांना कोर्टात बोलावून विचारणा करणं याचे चुकीचे राजकीय अर्थ काढले जातील असं ते म्हणाले, त्यावर स्पष्टिकरण देतांना सरन्यायाधीश म्हणाले, की मंत्र्यांना बोलावणं हे फक्त माहिती घेण्यासाठी आहे. त्यांना हजर राहण्याचे आदेश आम्ही दिलेले नाहीत. अजित दादा, आपण उगाच वेगळे राहिलो, आधीच एकत्र यायला हवं होतं - उद्धव ठाकरे गडकरी हे कायम ईलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी आग्रही असतात. त्यांच्या मंत्र्यालयाने यासाठी अनेक उपाययोजनाही केल्या आहेत. प्रदुषण कमी करायचं असेल तर त्याशिवाय पर्याय नाही असंही गडकरी कायम सांगत असतात. त्यामुळे सरकारी पातळीवर नेमकं काय चाललं आहे. रस्ते वाहतूक मंत्रालय काय उपायोजना करतं आहे, आपण काय करू शकतो या सगळ्या शक्यतांचा विचार करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना बोलवा असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. हेही वाचा... EXCLUSIVE कसाबला मारण्याचा दाऊदचा प्लान? छोटा शकीलचा पहिल्यांदाच खळबळजनक खुलासा

  तेलंगणातल्या कृष्णाच्या स्वप्नात आले ट्रम्प, आता 6 फुट मूर्तीची करतो पूजा

  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Nitin gadkari, Suprim court of india

  पुढील बातम्या