भावी पंतप्रधान कोण होईल काही सांगता येत नाही - रामदेव बाबा

भावी पंतप्रधान कोण होईल काही सांगता येत नाही - रामदेव बाबा

मागच्या लोकसभा निवडणुकांवेळी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांना खुलं समर्थन करणारे योगगुरू बाबा रामदेव यांचा निर्णय या आता डगमगलेला दिसतो.

  • Share this:

तमिळनाडू, 26 डिसेंबर : मागच्या लोकसभा निवडणुकांवेळी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांना खुलं समर्थन करणारे योगगुरू बाबा रामदेव यांचा निर्णय या आता डगमगलेला दिसतो. कारण 'आताच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान कोण होणार याबद्दल काही सांगू शकत नाही', असं विधान त्यांनी केलं आहे.

तमिळनाडू राज्यातील मदुराई या शहरात एका कार्यक्रमावेळी रामदेव बाबा बोलत होते. "देशाची राजकीय परिस्थिती सध्या खूप कठीण आहे. त्यामुळे पुढचे पंतप्रधान कोण असेल हे सांगता येत नाही", असं रामदेव बाबा म्हणाले.

योगगुरू रामदेव बाबा पुढे म्हणाले की, 'मी राजकारणावर लक्ष देत नाही. मी कोणाचंही समर्थन अथवा विरोध करत नाहीये. आमचं लक्ष सांप्रदायिक किंवा हिंदू भारत निर्माण करण्याचं नाही तर आध्यात्मिक भारत आणि जगाची निर्मिती करण्याचं आहे.'

खरंतर, बाबा रामदेव यांना राजकिय, आर्थिक आणि सामाजिक मुद्द्यांवर आपलं स्पष्ट मत मांडण्यासाठी ओळखलं जातं. नुकतंच त्यांनी बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्याकडून बुलंदशहरमध्ये उसळलेल्या हिंसेवर केल्या गेलेल्या वक्तव्यावरही रामदेव बाबांनी आपलं मत मांडलं होतं.

नसीरुद्दीन शाहला उत्तर देताना ते म्हणाले की, 'भारतात जितकी सहिष्णुता आहे, ती इतर कोणत्याच देशात नाही. शाह यांनी एकदा जग फिरलं पाहिजे.' असं ते म्हणाले होते.

त्याचबरोबर हनुमानाविषयी चाललेल्या वादावरही रामदेव बाबा यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. "हनुमानासारख्या देवाला जातीशी जोडणाऱ्या महापुरुषांचा मी अनादर करतो", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

VIDEO : ...अन् मुख्यमंत्र्यांनी आमदाराकडून खेचला माईक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 26, 2018 09:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading