दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राजकीय नेते? HIT LIST मध्ये आहेत 'हे' लोक

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राजकीय नेते? HIT LIST मध्ये आहेत 'हे' लोक

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं आता देशातील प्रमुख शहरांना लक्ष्य करण्याचा प्लॅन केला आहे.

  • Share this:

दिल्ली, 1 मार्च : जैश - ए - मोहम्मद ही दहशतवादी संघटना आता मोठा अतिरेकी हल्ला करण्याच्या तयारीमध्ये आहे. त्याकरता जैशनं तयारी देखील सुरू केल्याची माहिती अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून समोर आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात कडक पावलं उचलली गेली. काहींचा खात्मा केला गेला तर काहींना अटक केली गेली. दहशतवाद्यांनी जम्मू - काश्मीरशिवाय आपलं लक्ष आता देशातील प्रमुख शहरांकडे वळवल्याची माहिती आता समोर येत आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं एअर स्ट्राईक करत जैश ए मोहम्मदच्या तळांना लक्ष केलं. त्यामध्ये 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यानंतर देखील जैश आता देशातील इतर शहरांकडे लक्ष वळवत आहे.

निशाण्यावर कोण - कोण?

देशातील मोठे नेते, रेल्वे, तेल कंपन्या, उजव्या विचारसरणीचे लोक तसेच लष्कर आणि पोलीस दलातील निवृत्त अधिकारी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. याशिवाय, ज्या अधिकाऱ्यांनी खलिस्तान चळवळ किंवा दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली अशा अधिकाऱ्यांना देखील दहशतवादीा लक्ष्य करू शकतात.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत. 14 फेब्रुवारीनंतर लष्करानं केलेल्या कारवाईमध्ये दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात आला.

भारतीय लष्कराचा पुन्हा दणका, 2 दहशतवाद्यांचा ENCOUNTER

मसूद अजहर पाकिस्तानातच!

कुख्यात दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर पाकिस्तानाच आहे, अशी कबुली आता पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी दिली. याधी पाकिस्तानकडून मसूद अजहर आमच्या देशात नसल्याचा दावा केला जात होता. आता मात्र हा खोटारडेपणा उघड झाला आहे.

'मसूद अजहर पाकिस्तानात असून त्याला सध्या आजारानं ग्रासलं आहे. तो घराबाहेरही पडू शकत नाही. भारताने त्याच्या कृत्यांबाबत पुरावे द्यावेत. आम्ही कारवाई करू, असं शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटलं आहे.

तुम्ही कितीही कणखर असाल, पण हा VIDEO पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात नक्कीच अश्रू येतील

First published: March 1, 2019, 12:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading