News18 Lokmat

'ओबीसी'तील काही जातींना 'क्रिमीलेअर'मधून वगळण्याची शिफारस

मागासवर्ग आयोगाने विमुक्त गटात 14 जाती आणि भटक्या जमातीत 23 जाती तसंच ओबीसी यादीतील काही जातींना क्रिमिलेअर या संज्ञेतून वगळा व अशी शिफारस केलीय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 9, 2017 10:43 PM IST

'ओबीसी'तील काही जातींना 'क्रिमीलेअर'मधून वगळण्याची शिफारस

09 आॅक्टोबर : राजकीय दृष्टीने प्रभावी असलेल्या जातींना क्रिमीलेअर या संज्ञेतून वगळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य मागासवर्गीय आयोगानं तशी शिफारसच केली आहे.

केंद्र सरकारने क्रिमिलेअर ची मर्यादा 8 लाख पर्यंत केलीय. या आधारावर 8 लाख उत्पन्न असलेल्याना शैक्षणिक प्रवेश फी मध्ये लाभ, आणि नोकरीत पदोन्नतीच्या आरक्षण यामध्ये लाभ होतो. मागासवर्ग आयोगाने विमुक्त गटात 14 जाती आणि भटक्या जमातीत 23 जाती तसंच ओबीसी यादीतील काही जातींना क्रिमीलेअर या संज्ञेतून वगळा अशी शिफारस केलीय.

सरकारनं हा निर्णय घेतला तर भटके-विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग, अर्थात एसबीसी, आणि ओबीसींमधल्या काही जातींना आरक्षणाच्या लाभासाठी क्रिमीलेअरची अट राहणार नाही. पण असं करायचं असेल तर सुप्रीम कोर्टाच्या परवानगीशिवाय राज्य सरकारला ते करता येणार नाही.

ही शिफारस नेमकी काय आहे ?

पारंपरिक व्यवसाय करणारे किंवा ज्यांना बलुतेदार म्हटलं जातं, अशा काही जातींनी क्रीमी लेअरमधून वगळता येईल, अशी शिफारस ऑक्टोबर 2014मध्येच केली होती. 2019च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार यावर निर्णय घेऊ शकतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.

Loading...

 हा निर्णय झाला तर कोणत्या जातींना लाभ होऊ शकतो ?

 

- ओबीसींमध्ये माळी, तेली, भंडारी, सोमनंशी पाठारे, कुंभार, कासार, नाभिक, भावसार, सुतार, शिंपी, तांडेल, खाटीक आणि कुरेशी

- एसबीसीमध्ये गोवारी, गवारी, कोष्टी, हलबा कोष्टी, साळी, कोळी, मच्छीमार कोळी

- भटक्या विमुक्तांमध्ये धनगर, लोहार, बेलदार, गोंधळी, भोई, कोल्हाटी, वैदू, मुस्लिम मदारी, हलालखोर, गोपाळ, वंजारा, बंजारा, बेरड, भामटा. कैकाडी, वडार, पारधी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2017 10:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...