• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Jammu Kashmir: दहशतवाद्यांकडून 29 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून हत्या

Jammu Kashmir: दहशतवाद्यांकडून 29 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसाची हत्या केल्यानंतर दहशतवादी पळून गेले.

 • Share this:
  श्रीनगर, 08 नोव्हेंबर: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांनी (Terrorists) पुन्हा एकदा पोलिसांना लक्ष्य केलं आहे. रविवारी रात्री उशिरा श्रीनगरच्या (Srinagar) बटमालू भागात दहशतवाद्यांनी एका पोलिसाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसाची हत्या केल्यानंतर दहशतवादी पळून गेले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील बटमालू भागातील एसडी कॉलनीमध्ये दहशतवाद्यांनी 29 वर्षीय पोलीस हवालदार तौसीफची गोळ्या झाडून हत्या केली. पोलीस हवालदाराच्या डोक्यात गोळी लागली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी स्थानिक पोलीस आणि लष्कराकडून संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. नॅशनल कॉन्फरन्सने (NC) या हल्ल्याचा निषेध केला आहे. पक्षाने ट्विट केले, श्रीनगरच्या बाटमालू येथे 29 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही स्पष्टपणे निषेध करतो. निंदा करायला शब्द पुरेसे ​​नाहीत. हेही वाचा-  'या' वर्षापासून अयोध्येतील राम मंदिर सर्वांसाठी होणार खुले, लवकरच पूर्ण होणार पाया भरणी
   जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या कारवाईमुळे घाबरलेले दहशतवादी नागरिक, पोलीस आणि लष्कराच्या जवानांना लक्ष्य करत आहेत. दोन दिवसांपूर्वी श्रीनगरमधील SKIMS मेडिकल कॉलेजच्या बाहेर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाला लक्ष्य करून गोळीबार केला होता. ही गोळीबार केल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरुन फरार झाले. सुदैवानं दहशतवाद्यांच्या गोळीबारात सुरक्षा दलाच्या कोणताही जवान जखमी झालेला नाही.
  Published by:Pooja Vichare
  First published: