बाल्कनीचं काम करत असताना समोर आला सापळा : दिल्लीत 'दृश्यम'सारखी मर्डर केस

दिल्लीत २ वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्येची गोष्ट आत्ता उघडकीला येत आहे. दृश्यम चित्रपटाशी मिळतीजुळत्या या घटनेतलं गूढ वाढलं असून मामानेच भाच्याचा खून केल्याचं आता तब्बल २ वर्षांनी स्पष्ट होतंय. कसा उघडकीला आला हा गुन्हा?

News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2018 07:35 PM IST

बाल्कनीचं काम करत असताना समोर आला सापळा : दिल्लीत 'दृश्यम'सारखी मर्डर केस

दृश्यम चित्रपट आठवतोय... बायकोच्या हातून झालेला खून लपवण्यासाठी विजय मृतदेह कसा पुरतो तेही आठवत असेल.. या गूढपटाची आठवण यावी असं एक खून प्रकरण दिल्लीत उघडकीला येतंय.

दिल्लीत २ वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्येची गोष्ट आत्ता उघडकीला येत आहे. दृश्यम चित्रपटाशी मिळतीजुळत्या या घटनेतलं गूढ वाढलं असून मामानेच भाच्याचा खून केल्याचं आता तब्बल २ वर्षांनी स्पष्ट होतंय.

वेबसीरिज चटनी आणि काही वर्षांपूर्वीचा अजय देवगण अभिनित दृश्यम या चित्रपटाशी या हत्येचं बऱ्यापैकी साधर्म्य असल्याचं पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून उघड होतंय. दोन वर्षांपूर्वी दिल्लीच्या डाबडी भागात ही घटना घडली. चंद्र प्रकाश नावाचा आपला भाचा गायब झाल्याची तक्रार त्याच्या मामानेच २ वर्षांपूर्वी पोलिसात दाखल केली होती. आता उघड होतंय की, हा मामाच चंद्र प्रकाशचा मारेकरी होता.

हे मामा चंद्र प्रकाशच्या बरोबरच तिसऱ्या मजल्यावरच्या घरात भाड्यानं राहायचे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी प्रकाश बेपत्ता असल्याची तक्रार डाबडी पोलीस ठाण्यात केली आणि त्यानंतर काही दिवसातच मामाही ते घर सोडून दुसरीकडे राहायला गेला. या घरात राहायला आलेल्या नव्या भाडेकरूनं काही कारणासाठी घराचं नूतनीकरण सुरू केलं, त्या वेळी बाल्कनीचं काम करताना त्याला फरशीखाली एक सापळा सापडला आणि मग खळबळ उडाली. हा सापळा २ वर्षांपूर्वी गायब झालेल्या चंद्र प्रकाशचाच असू शकतो.

Loading...

पोलिसांनी आपल्या तपासाला पुष्टी देण्यासाठी हा सापळ्यात रुपांतरीत झालेला मृतदेह डीएनए चाचणीसाठी पाठवला आहे. २०१६मध्ये चंद्र प्रकाशच्या बेपत्ता झाल्यानंतर तपास करणाऱ्या पोलीस कर्माचाऱ्यांकडे आता पुन्हा नव्याने चौकशी करण्यात येत आहे. आरोपी मामा फरार आहे. हे दोन्ही मामा - भाचे मूळचे आंध्र प्रदेशचे असल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2018 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...