Home /News /national /

पुलवामामध्ये शेतात आढळला पोलिसाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह; दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून केली हत्या

पुलवामामध्ये शेतात आढळला पोलिसाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह; दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून केली हत्या

समोर आलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात रात्री दहशतवाद्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    पुलवामा 18 जून : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पंपोर भागात एका पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह गूढ स्थितीत सापडला आहे. तसंच, मृत एसआयच्या शरीरावर गोळ्यांच्या अनेक खुणा आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उपनिरीक्षकाचं नाव फारुख अहमद असं आहे. ते आयआरपीमध्ये तैनात होते. ते मंत्रिमंडळातील कर्मचारी होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे (Body of Sub Inspector Found in Pulwama). सिद्धू मुसेवालाला खरंच संतोष जाधवने मारली गोळी? 5 दिवसांच्या चौकशीत नवा खुलासा, प्रकरणाला वेगळंच वळण समोर आलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात रात्री दहशतवाद्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह त्यांच्या मूळ गावातील भातशेतीत सापडला. ते सीटीसी लेथपोरा येथे आयआरपी 23 व्या बटालियनमध्ये ओएसआय म्हणून तैनात होते. गोळी लागून गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. “त्यांच्या हृदयाजवळ गोळीची एक जखम आढळून आली. आम्ही तपास सुरू केला आहे, ” असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) सुरक्षा दलांचे ऑपरेशन ऑलआऊट (Operation All-Out) सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांसह (Jammu and Kashmir police) लष्कराचे जवान (Army)अनेक भागात शोध मोहिमेदरम्यान सतत दहशतवाद्यांचा (Terrorist)खात्मा करताना दिसतात. 3 दिवसांपूर्वी मंगळवारी रात्री उशिरा शोपियानमध्ये (Shopiana) झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. Pune : ब्लड कॅन्सरचं निदान झाल्यानंतर पहिल्यांदाच रुग्णालयातून प्रकाश आमटेंचा फोटो आला समोर जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या जवानांना संयुक्त मोहिमेअंतर्गत शोपियानच्या कांजीउलर भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर त्यांना मोठं यश मिळालं होतं. त्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम तीव्र केली. अशात आता पुन्हा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एका पोलिसाने जीव गमावल्याची माहिती समोर आली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Police

    पुढील बातम्या