लग्नाच्या वाढदिवशीसुद्धा झाली नाही भेट, पत्नीसाठी पोलीस पतीने पाठवलं 'हे' गिफ्ट

लग्नाच्या वाढदिवशीसुद्धा झाली नाही भेट, पत्नीसाठी पोलीस पतीने पाठवलं 'हे' गिफ्ट

पोलीस अधिकाऱ्याची पत्नीसुद्धा पोलीस उपनिरीक्षक आहे. दाम्पत्याच्या लग्नाचा वाढदिवस शनिवारी होता. मात्र ड्युटीमुळे दोघांनाही भेटता आलं नाही.

  • Share this:

जयपूर, 19 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. या संकटकाळात आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि प्रशासन कोरोनाशी लढा देत आहे. वेळप्रसंगी घरच्या लोकांपासून दूर राहून जनतेची सेवा करत आहेत. असाच एक पोलीस उपनिरीक्षक 15 दिवसांपासून जयपुरमधील प्रताप नगरमधल्या आरयूएचएसच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ड्युटीवर आहे. त्याला या काळात एक दिवसही घरी जाता आलं नाही. सुंदरलाल असं नाव असेलल्या पोलीस अधिकाऱ्याची पत्नीसुद्धा पोलीस उपनिरीक्षक आहे. या दाम्पत्याच्या लग्नाचा वाढदिवस शनिवारी होता. मात्र ड्युटीमुळे दोघांनाही भेटता आलं नाही.

लग्नाच्या वाढदिवशी भेट झाली नाही तरी सुंदरलाल यानं एका ओळखीच्या व्यक्तीकडून पत्नीला गिफ्ट मात्र पोहोचवलं. सुंदरलाल यांची पत्नी मंजू तंवर यासुद्धा ड्युटीवर होत्या. आताचं कोरोनाचं संकट पाहता त्याच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी सुंदरलाल यांनी पत्नीला सॅनिटाय़झरची बाटली, चार मास्क आणि ज्यूस पाठवला.

सुंदरलाल म्हणाले की, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीला फोन केला. तिला सांगितलं की लग्नाच्या वाढदिवसाची एक मौल्यवान भेट पाठवत आहेत. पत्नीला ही भेट मिळाल्यानंतर सुंदरलाल यांच्याही डोळ्यात पाणी आलं. सुंदरलाल यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचारीही यावेळी भावुक झाला होता.

फक्त सॅनिटायझर आणि मास्कच नाही तर त्यासोबत एक पत्रही सुंदरलाल यांनी पाठवलं होतं. त्यामध्ये त्यांनी सध्याच्या कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगवरून पत्नीला संदेश देत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शादी की सालगिरह भी, फंसी कोरोना के साये में,

प्रिये तुम करेला जूस लो, मिलाकर नीम गिलोय में

होकर पूर्णत: सैनेटाइज होम आइसोलेशन में डटे रहो

मुंह पर मास्क लगाकर तुम, हाथ साबुन से धोते रहो

मुझे बाहर आने की मनाही है, मैं अस्पताल में डटा हुआ

प्रिये कैसे उपहार भेजूं, मैं पीपीई किट में हूं लिपटा हुआ

जिंदा रहेंगे तो मिलेंगे, मन की लेखनी से यही लिखेंगे

जोड़ी सलामत रहे हमारी, रब से यही दुआ करेंगे

संक्रमण से बच निकलकर, तुम्हें भेजूंगा उपहार और माला

लेकिन तब तक प्रिये तुम, पीते रहो घृतकुमारी रस का प्याला

मैं हार नहीं मानूंगा, प्रिये मैं तुम्हारे लिए, मास्क व सैनेटाइजर जरूर भेजूंगा।

मंजू तंवर आणि सुंदरलाल यांचे लग्न चार वर्षांपूर्वी झाले. दोघेही पोलीस उपनिरीक्षक आहेत. लॉकडाऊनच्या आधी सुंदरलाल यांनी पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाला डिनरवर न्यायचं आणि गिफ्ट द्यायचं असं ठरवलं होतं. पण अचानक लॉकडाऊन झालं आणि त्यांची ड्युटी लागली. क्वारंटाइन सेंटरवर असलेल्या ड्युटीमुळे बाहेर कुठेही जाता येत नाही. पत्नीशी मोबाईलवरूनच बोलता येतं असंही सुंदरलाल म्हणाले.

हे वाचा : पुणेकरांनो हे आहेत तुमचा जीव वाचवणारे खरे रक्षक, हा VIDEO नक्की बघा

संपादन - सूरज यादव

First published: April 19, 2020, 4:07 PM IST

ताज्या बातम्या