कराची, 16 एप्रिल : पाकिस्तानातील (Pakistan) सर्वाच मोठ शहर कराचीच्या पीआयबी कॉलनीत अन्न-धान्याचे वाटप करीत असताना झालेल्या वादाने हिंसक रुप धारण केलं. यादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शेजारील इमारतीच्या छतावर उभी असलेल्या महिलेला गोळी लागली.
जियो टिव्हीने दिलेल्या बातमीनुसार, पीआयबी कॉलनी गोराबाद रोडवर मंगळवारी रात्री दोन समाजसेवा संघटनेतर्फे अन्न-धान्याचं वाटप केलं जात होतं. यादरम्यान लॉकडाऊन उल्लंघनची सूचना मिळताच तेथील लोकांना जाण्याचं आवाहन केलं. मात्र यादरम्यान पोलीस आणि संघटनेच्या लोकांमध्ये वाद सुरू झाला.
इमारतीच्या गच्चीवर उभी असलेल्या महिलेला लागली गोळी
यादरम्यान पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. यावेळी जवळील इमारतीच्या गच्चीवर उभी असलेल्या 26 वर्षी तरुणी सबा जौजाह नोमान जखमी झाली. तिच्या डोक्याला गोळी लागली. तिला जवळील रुग्णालयात हलविण्यात आले मात्र ती वाचू शकली नाही.
यानंतर भागातील जनतेने पोलिसांविरोधात प्रदर्शन सुरू केलं आहे. गोळी मारणाऱ्या पोलिसाचं नाव अजीम असं असून यापूर्वीही तो स्थानिकांना त्रास देत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या पोलिसाविरोधात तक्रार करण्यात आली आहे.
चार पोलीस ताब्यात
दुसरीकडे घटनास्थळी उपस्थित असलेल्या चार पोलिसांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय बंदुकही ताब्यात घेण्यात आली आहे.
संबंधित -
सरोगसीने जन्मलेल्या बाळाची तब्बल 17 दिवसांनी झाली भेट; आई-बाबांचे डोळे आले भरुन
Lockdown 2 : हिमालयातल्या केदारनाथाचा मुकुट महाराष्ट्रात अडकला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.