युपीमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी सापडली शस्त्रं आणि सव्वा क्विंटल सोनं

उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रं आणि सोनं जप्त करण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 10:22 PM IST

युपीमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी सापडली शस्त्रं आणि सव्वा क्विंटल सोनं

लखनऊ, 17 एप्रिल : देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडण्यापूर्वी पोलिस प्रशासन सज्ज झालं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू यासाठी पूर्ण खूबरदारी घेतली जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये उद्या ( गुरूवारी ) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्याच्या अवघ्या काही तास अगोदर पोलिसांनी तब्बल 8593 शस्त्रास्त्रं, 11541 काडतूसं, 6518 किलो दारू आणि 4146 बॉम्ब जप्त केले आहेत. यावरच हा आकडा न थांबता तब्बल सव्वा क्विंटल सोनं देखील जप्त करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आता पोलिस कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायला तयार नसून त्यांनी धडक कारवाईला सुरूवात केली आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत 11 लाख लिटर विदेशी दारू, सोनं, चांदी आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र देखील जप्त करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 8 जागांवर उद्या मतदान होणार आहे. शस्त्रास्त्रं आणि दारू गोळ्याची किंमत ही तब्बल 30 कोटींच्या घरात आहे.


निवडणूक आयोगाला सापडलं घबाड, 1 हजार 381 किलो सोनं जप्त!


Loading...

तब्बल हजार 381 किलो सोनं जप्त!

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाने आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. तामिळनाडूमधील चेन्नईजवळच्या एका चेकपोस्टवर तब्बल 1 हजार 381 किलो सोन जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंत हे समजू शकले नाही की इतक्या मोठ्या प्रमाणात सोन कोठे पाठवण्यात येत होते. चेन्नईला रिटेल गोल्ट कॅपिटल असे म्हटले जाते. त्यामुळे हे सोनं एखाद्या व्यापाऱ्याचे देखील असू शकते, अशी शक्यता आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने बुधवारी ही धडक कारवाई केली. चेन्नई जवळच्या अवादी चेकपोस्टवर एका गाडीतून 1 हजार 381 किलो सोनं जप्त करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं कोठे पाठवण्यात येत होते याचा तपास सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर आयोगाने देशातील अनेक ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त केली होती. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला जातो. यासाठी आयोगाकडून देखील कारवाई केली जाते. बुधवारी आयोगाने टीटीव्ही दिनकरन यांच्या अम्मा मक्कल मुनेत्र कळघम पक्षाच्या कार्यालयावर छापा टाकला होता. या छाप्यात कार्यालयातून एका कार्यकर्त्याकडून 1 कोटी 48 लाख रुपये जप्त करण्यात आले होते.


VIDEO : भाजप नेत्याला धमकी देणाऱ्या 'त्या' ऑडिओ क्लिपबाबत सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 10:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...