अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या या मोहिमेचा निषेध केला आहे. त्यांच्या मते, अशा प्रकारे नागरिकांच्या फोनची तपासणी करणं हे 'गोपनीयतेचं उल्लंघन' (infringement of privacy) आणि 'बेकायदेशीर' (illegal) आहे. 'पोलिसांना अशाप्रकारे लोकांचे फोन तपासण्याचा अधिकार नाही. जर त्यांना तपासणी करायचीच असेल, तर त्यांनी कायद्यानं प्रस्थापित केलेल्या प्रक्रियेचं पालन करून ती करावी. अशाप्रकारे रस्त्यावर तपासणी करून पोलीस नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन करत आहेत. हे नक्कीच बेकायदेशीर आहे, अशा शब्दांत तेलंगणा उच्च न्यायालयाचे वकील करम कोमीरेड्डी यांनी हैदराबाद पोलिसांच्या तपासणी मोहिमेवर टीका केली. याशिवाय ट्विटरवर देखील अनेकांनी पोलिसांना जाब विचारला आहे. तर, काही नागरिकांनी पोलिसांच्या मोहिमेला पाठिंबा देखील दिला आहे. वाचा : 2 बायकांची हौस पुरवता पुरवता नवऱ्याचे झाले हाल; अखेर उचचलं धक्कादायक पाऊल याबाबत पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हैदराबाद पोलीस रस्त्यावर उभं राहून अचानक नागरिकांचे व्हॉट्सअॅप चॅट तपासत असल्याची मला पूर्ण कल्पना आहे. आम्ही जाणीवपूर्वक ही मोहीम सुरू केली आहे. मात्र, आम्ही तपासणीदरम्यान कोणावरही जबरदस्ती करत नाही किंवा त्यांचे फोन हिसकावून घेत नाही. लोक पोलिसांना सहकार्य करत आहेत. त्यामुळे मला या मोहिमेत काही गैर वाटत नाही, असं स्पष्टीकरण दक्षिण विभागाचे पोलीस उपायुक्त गजाराव भूपाल (Gajarao Bhupal) यांनी द न्यूज मिनिटशी बोलताना दिलं आहे. डीसीपी भूपाल यांच्या मते, लोक त्यांचा फोन देण्यास नकारही देऊ शकतात. मात्र, त्यानंतर देखील सखोल तपास आणि कायदेशीर तरतुदींचा आधार घेऊन आम्ही त्यांचा फोन तपासू शकतो. आतापर्यंत आम्हाला अशा परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली नाही. कारण, कुणीही फोन देण्यास नकार दिलेला नाही, असंही डीसीपी भूपाल म्हणाले.Hyderabad city police will not take rest until #Ganja is completely eliminated from #Hyderabad.
A group of Police were seen stopping commuters and checking their phones to look for words such as 'drugs' or 'ganja'.#HyderabadCityPolice pic.twitter.com/HpKRmYrtRc — Surya Reddy (@jsuryareddy67) October 28, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.