मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोलकात्यातील भाजप कार्यालयाजवळ आढळले 51 क्रूड बॉम्ब, परिसरात खळबळ

कोलकात्यातील भाजप कार्यालयाजवळ आढळले 51 क्रूड बॉम्ब, परिसरात खळबळ

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधून (Kolkata) 51 क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. जिथे बॉम्ब आढळले ती जागा भाजप कार्यालयाच्या जवळच (Crude Bombs Near BJP Office) आहे.

  • Published by:  Kiran Pharate
कोलकाता 06 जून : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधून (Kolkata) 51 क्रूड बॉम्ब म्हणजेच देशी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. कोलकातामधील खिदिरपुर चौकाजवळ एका बॅगमध्ये 51 देशी बॉम्ब सापडले. याबाबतची माहिती मिळताच बॉम्बची विल्हेवाट लावण्यासाठी पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. जिथे बॉम्ब आढळले ती जागा भाजप कार्यालयाच्या जवळच (Crude Bombs Near BJP Office) आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाबद्दल अन्य कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हे सर्व बॉम्ब क्रूड बॉम्ब असून कमी तीव्रतेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. सद्यस्थितीत सर्व बॉम्ब निष्क्रीय केले गेले आहेत. हे बॉम्ब कोलकाता पोलिसांच्या अॅन्टी राउडी सेक्शननं जप्त केले आहेत. गुपित माहितीच्या आधारे याठिकाणी छापेमारी करण्यात आली. विशेष बाब म्हणजे पश्चिम बंगालमध्ये याआधीही अनेकदा बॉम्ब आढळून आले आहेत. कोरोनामुळे आई-बाबांच छत्र हरवलं, यशोमती ठाकूर यांनी घरी जाऊन मुलाची घेतली भेट विधानसभा निवडणुकांच्या काळात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी पोलिसांनी 41 क्रूड बॉम्ब आढळून आले होते. हे बॉम्ब दक्षिण 24 परगनाच्या बरुईपुर परिसरात आढळले होते. पोलिसांच्या झाडाच्या झुडपातून हे बॉम्ब जप्त केले होते. या घटनेच्या आधी बरुईपुरमध्ये गृहमंत्री अमित शाह आणि ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी रोड शो केला होता. धक्कादायक! मैत्रिणींसोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार याआधीही 26-28 मार्चच्या दरम्यान 82 क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आले होते. नरेंद्रपुर परिसरातही एकसोबतच 56 क्रूड बॉम्ब आढळून आले होते. त्यामुळे निवडणुकांचं पार्श्वभूमीवर वातावरण तापलेलं होतं.
First published:

Tags: Bomb Blast, Kolkata

पुढील बातम्या