Home /News /national /

कोरोनाबाधित पत्नीच्या देखभालीसाठी नोकरी सोडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा यु-टर्न; राजीनामा घेतला परत

कोरोनाबाधित पत्नीच्या देखभालीसाठी नोकरी सोडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा यु-टर्न; राजीनामा घेतला परत

कोरोना पॉझिटिव्ह पत्नीच्या देखभालीसाठी सुट्टी न मिळाल्यानं नोकरी सोडलेल्या सीओ मनीष चंद्र सोनकर (CO Manish Sonkar) यांनी अखेर राजीनामा (Withdrew Resignation) परत घेतला आहे.

    झाशी, 05 मे: कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) पत्नीच्या देखभालीसाठी सुट्टी न मिळाल्यानं नोकरी सोडलेल्या सीओ मनीष चंद्र सोनकर (CO Manish Sonkar) यांनी अखेर राजीनामा (Withdrew Resignation) परत घेतला आहे. सीओ मनीष सोनकर यांनी मंगळवारी आपला राजीनामा मागं घेतला. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर दिली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'झाशी रेंजचे डीआयजी जोगी कुमार यांनी माझ्याशी फोनवर संवाद साधला असून कुटुंबीयांच्या आरोग्याची विचारपूस केली आहे. त्यांनी घडलेल्या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं असून अशा परिस्थितीत तुम्हाला सुट्टी मिळायला हवी होत, असं म्हटलं आहे. डीआयजी रेंज झांसी यांच्याशी झालेल्या संवादानंतर मी समाधानी आहे.' त्याचबरोबर, सीओ यांनी पुढं लिहिलं की, कोरोनाच्या संकटकाळात सर्व उच्च अधिकारी माझ्या पाठीशी आहेत. आणि माझ्या काहीही चुकीचं घडणार नाही. डीआयजी रेंज झांसी यांच्यासोबत झालेल्या संवादानंतर मी पूर्णपणे समाधानी आहे. माझ्या कुटुंबातील बरेच लोकं उत्तर प्रदेशच्या आरोग्य सेवांशी जोडलेले आहेत. देशात कोविडचा उद्भाव झाल्यापासून ते आपलं कर्तव्य बजावत आहेत. तसेच माझ्या घरातील काही जण सध्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे त्यांच्या देखभालीसाठी मला सुट्टीची आवश्यकता होती. एसएसपीवर रजा न दिल्याचा लावला आरोप सीओ मनीषचंद्र सोनकर पुढे म्हणाले की, या संपूर्ण घटनेमुळं माझ्या आरोग्यावर विपरित परिणाम होतं आहेत. त्यामुळे मला हे प्रकरण बंद करायचं आहे. त्यामुळे मी भावनेच्या भरात राजीनामा दिला होता. तो राजीनामा नाकारला जावा यासाठी मी वरिष्ठांना विनंती करतो. हे वाचा-पत्नीला कोरोना झाल्यानं मुलीची जबाबदारी खांद्यावर; सुट्टी न मिळाल्यानं पोलीस अधिकाऱ्याचा थेट राजीनामा सोनकर यांच्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्यानं मुलीच्या देखभालीची जबाबदारी त्यांच्यावर पडली होती. अशा स्थितीत मनीष सोनकर यांनी वरिष्ठांकडे सुट्टीसाठी अर्ज केला होता. मात्र, सुट्टी न मिळाल्यानं त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला (Circle Officer Resigned) दिला होता. सोनकर हे उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये सर्कल ऑफिसर होते. पण आता त्यांनी राजीनामा नाकारला जावा, अशी विनंती केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Uttar pradesh

    पुढील बातम्या