मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोना काळात लग्न करणं जोडप्याला पडलं महागात, पोलिंसांनी आणलं शुभकार्यात विघ्न; मारावा लागला कारला धक्का

कोरोना काळात लग्न करणं जोडप्याला पडलं महागात, पोलिंसांनी आणलं शुभकार्यात विघ्न; मारावा लागला कारला धक्का

पोलिसांनी लग्न मंडपातून घरी निघालेल्या नवरा-नवरीची (Groom-Bride) गाडी विनाकारण अडवत गाडीच्या टायरमधील हवा काढून दिली. मात्र, शेजारुनच जात असलेल्या एका पक्षाचा झेंडा लावलेल्या गाडीवर पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही.

  • Published by:  Kiran Pharate

पाटणा 03 मे : कोरोनाच्या संकट (Corona Pandemic) काळात अनेक पोलीस आणि डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, या संकटाच्या काळातही काही डॉक्टर (Doctor) आणि पोलीस (Police) मात्र मनमानी कारभार करुन परिस्थितीचा फायदा घेत असल्याच्या बातम्याही अनेकदा समोर येत आहेत. अशीच आणखी एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत पोलिसांनी लग्न मंडपातून घरी निघालेल्या नवरा-नवरीची (Groom-Bride) गाडी विनाकारण अडवत गाडीच्या टायरमधील हवा काढून दिली. मात्र, शेजारुनच जात असलेल्या एका पक्षाचा झेंडा लावलेल्या गाडीवर पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनदरम्यान (Lockdown) हा नवरदेव आपल्या नवरीला घेऊन घरी निघाला होता.

हे प्रकरण मध्य प्रदेशच्या रीवामधील चोरहटा ठाणा क्षेत्रातील आहे. इथे पोलिसांनी लग्न करुन परतणाऱ्या नवरा नवरीची गाडी अडवली आणि कारच्या टायरमधील हवा सोडून दिली. याचदरम्यान शेजारुन भाजपचा झेंडा गाडीवर लावलेली एक चारचाकी गेली, मात्र पोलिसांनी त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही. मात्र, इतर अनेक वाहनांमधील हवा पोलिसांनी सोडली. यानंतर घरी पोहोचण्यासाठी लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

सरकारनं लग्नाबाबत घातलेल्या नियमांचं पालन करुनही पोलिसांनी केलेलं हे कृत्य संतापजनक असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत माध्यमांनी जेव्हा अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजय डाबर यांच्यासोबत बातचीत केली, तेव्हा त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभासाठी घालण्यात आलेल्या नियमांच्या अंतर्गत ही कारवाई केल्याचं म्हटलं आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार पाहाता मध्य प्रदेश सरकारनं लॉकडाऊनची घोषणा केलेली असतानाच, शिवराज सिंह चौहान यांनी लग्नसमारंभाबाबत नवीन गाईडलाईन तयार केल्या होत्या. यात असं नमूद करण्यात आलं होतं, की आपल्याच घरामध्ये कुटुंबीय लग्नसमारंभ करू शकतात. मात्र, रीवामध्ये मुख्यमंत्र्याच्या या आदेशाचं पालन होत नसल्याचं चित्र आहे. पोलीस कर्मचारीच त्यांचा हा आदेश पाळत नसल्याचं चित्र आहे. विनाकारण पोलीस नागरिकांना त्रास देत असल्याचं चित्र याठिकाणी पाहायला मिळत आहे.

First published:

Tags: Lockdown, Police, Wedding couple