लोका सांगे ब्रह्मज्ञान! तपासणी करणाऱ्या पोलिसाला स्वत:लाच करावा लागला दंड, पाहा VIDEO

लोका सांगे ब्रह्मज्ञान! तपासणी करणाऱ्या पोलिसाला स्वत:लाच करावा लागला दंड, पाहा VIDEO

वाहनांची तपासणी करत असताना एका पोलिसाला स्वत:च्याच गाडीची पावती फाडावी लागली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

रायबरेली, 06 ऑक्टोबर : अनेकदा ट्राफीक पोलिसांनी गाडी अडवली की वाहन चालकासोबत हमरीतुमरी होते. कधीकधी तर हाणामारीपर्यंत प्रकरणं पोहचतं. ट्राफीक पोलिसांकडून पोलिसांनाच दंड, अधिकाऱ्यांनी नियम मोडला हे आतापर्यंत ऐकलं होतं. पण एका पोलिसाला स्वत:च्याच गाडीची पावती फाडावी लागली. तपासणी करत असताना पोलिस स्वत: हेल्मेट न घालता होता. त्याशिवाय गाडीची कागदपत्रेसुद्धा जवळ नव्हती. त्यामुळे लोकांनी त्याला विरोध केला. अखेर पोलिसाला स्वत:च्याच गाडीची पावती फाडावी लागली.

स्वत:च्या गाडीची पावती फाडावी लागल्यानं पोलिसाने तीन लोकांना जबरदस्तीनं पोलिस ठाण्यात बसवून घेतल्याचाही प्रकार समोर आला. तसेच स्वत:लाच दंड करत असतानाचा पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

महराजगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस अशोक कुमार वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी दंड करण्यावरून स्थानिकांशी बाचाबाची झाली. तेव्हा स्थानिकांनी अशोक कुमार यांच्याकडेच कागदपत्रे आणि हेल्मेट नसल्याने त्याला स्वत:च्या गाडीची पावती फाडायला लावली.

याप्रकरणी रायबरेलीचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक शशी शेखर सिंह यांनी सांगितलं की, प्रकरणाची माहिती आम्हाला मिळाली आहे. चौकशी केल्यानंतरच यावर काही बोलता येईल. कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

VIDEO : माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

First published: October 6, 2019, 11:44 AM IST
Tags: traffic

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading