मराठी बातम्या /बातम्या /देश /

रात्री पत्नीने दरवाजा उघडण्यासाठी केला उशीर, DSPने झाडल्या गोळ्या

रात्री पत्नीने दरवाजा उघडण्यासाठी केला उशीर, DSPने झाडल्या गोळ्या

ही घटना शनिवारी रात्रीची आहे. अतुल सोनी दुपारी अडीचच्या सुमारास पार्टीमधून घरी परतला. झोप लागली असल्यामुळे पत्नीने घराचा दरवाजा बराच उशिरा उघडला.

ही घटना शनिवारी रात्रीची आहे. अतुल सोनी दुपारी अडीचच्या सुमारास पार्टीमधून घरी परतला. झोप लागली असल्यामुळे पत्नीने घराचा दरवाजा बराच उशिरा उघडला.

ही घटना शनिवारी रात्रीची आहे. अतुल सोनी दुपारी अडीचच्या सुमारास पार्टीमधून घरी परतला. झोप लागली असल्यामुळे पत्नीने घराचा दरवाजा बराच उशिरा उघडला.

    चंदीगड, 22 जानेवारी : सिंघम नावाने ओळखल्या जाणाऱ्या डीएसपी अतुल सोनी (DSP Atul Soni) वर पंजाब पोलिसांत खुनाचा प्रयत्न (Attempt to murder) आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये (Arms Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा आरोप केला जात आहे की, सोनीने आपली पत्नी सुनीता सोनी यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. काय झालं त्या रात्री? ही घटना शनिवारी रात्रीची आहे. अतुल सोनी दुपारी अडीचच्या सुमारास पार्टीमधून घरी परतला. झोप लागली असल्यामुळे पत्नीने घराचा दरवाजा बराच उशिरा उघडला. डीएसपी सोनी यावर इतका संतप्त झाला की त्याने पत्नीवर गोळी झाडली. मात्र, यात ती थोडक्यात बचावली. असं म्हटलं जात आहे की गोळी डोक्याच्या वरच्या बाजूस गेली आणि पत्नी जिवंत वाचली. इतर बातम्या - रक्तबंबाळ होऊन कुंबळे खेळला क्रिकेट! पाहा तो क्षण ज्याचा मोदींनी केला उल्लेख पत्नीने दिला घटनेचा पुरावा हल्ल्यानंतर डीएसपीच्या पत्नीने मोहालीच्या स्टेशनच्या फेज 8 मध्ये तिच्या पतीविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अतुल सोनीने त्याच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरवरून नव्हे तर बेकायदेशीर रिव्हॉल्व्हरवरून गोळी चालविली असल्याचा आरोप आहे. सोनीच्या पत्नीनेही या घटनेत वापरलेली शस्त्रे आणि काडतुसे पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत. अतुल सोनी सध्या फरार आहे. इतर बातम्या - Pariksha Pe Charcha 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे DSPचा वाद आणि गुन्ह्याचा जुना रेकॉर्ड पंजाबच्या या सिंघमच्या जुन्या रेकॉर्डवरून अतुल सोनीने बर्‍याच पंजाबी चित्रपट आणि व्हिडिओंमध्येही काम केले आहे आणि बॉडी बिल्डिंगमध्येही पंजाब पोलिसांचा लोकप्रिय चेहरा आहे. यापूर्वीही बर्‍याचदा तो वादात अडकला आहे. जून 2012मध्ये त्याला दिल्ली विमानतळावर शस्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. मार्च 2013मध्ये सोनीविरोधात खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर गेल्या वर्षी मार्चमध्ये सोनीच्या मुलाला रोड अपघाताच्या प्रकरणात अटक केली होती. त्यांच्या कारनेच एका एनराईचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. इतर बातम्या - ज्या वॉकरने चालायला शिकणार त्यानेच संपलं आयुष्य, चिमुकल्याच्या मृत्यूने काळजाचं
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Murder, Punjab

    पुढील बातम्या