केशोद, गुजरात, 22 सप्टेंबर : गेली अनेक वर्ष गुजरात राज्यामध्ये दारुबंदी आहे. तरी देखील पोलिसांकडून कोट्यवधींची दारू बऱ्याचदा जप्त केली जाते आणि तिची विल्हेवाट लावली जाते. मात्र गुजरातमधील केशोद (Keshod, Gujrat) याठिकाणी या जप्त केलेल्या दारूची विल्हेवाट लावताना एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. पोलिसांनी तस्करीमध्ये पकडलेल्या दारूच्या बाटल्यांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात आली होती. दरम्यान याठिकाणी खड्ड्यामध्ये जी शिल्लक दारू होती ती गोळा करण्यासाठी झुंबड उडाली होती. पोलिसांच्या समोर लोकांनी दारू उचलण्यास सुरुवात केली. याचाच एक व्हिडीओ न्यूज18 लोकमतच्या हाती लागला आहे.
ही दारु गोळा करणाऱ्या लोकांनी सर्दी-पडसं असताना ही दारू उपयोगात येईल अशी कारणं दिली. गुजरातमध्ये दारूबंदी असताना एवढी दारू येते कुठून आणि ती नष्ट करण्याचा योग्य बंदोबस्त का केला जाऊ नये असा सवाल यावेळी उपस्थित केला जात आहे. लोकं दारू गोळा करताना पोलिसांनी घेतलेली बघ्याची भूमिका देखील आश्चर्यकारक आहे.
(हे वाचा-लीलावती रुग्णालयाच्या कारभारावर भडकली सलमानची ही अभिनेत्री, शेअर केला VIDEO)
केशोद, गुजरात : पोलिसांनी तस्करीमध्ये पकडलेल्या दारूच्या बाटल्यांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात आली. दरम्यान याठिकाणी जी शिल्लक दारू होती ती गोळा करण्यासाठी झुंबड उडाली होती. पोलिसांच्या समोर लोकांनी दारू उचलण्यास सुरुवात केली. pic.twitter.com/WeI9alHu75
— News18Lokmat (@News18lokmat) September 22, 2020
देशातील ज्या काही मोजक्या राज्यांमध्ये दारूबंदी आहे, त्या राज्यांच्या यादीमध्ये गुजरात राज्याचं नाव अग्रक्रमाने घेण्यात येतं. गुजरात हे नवं राज्य म्हणून अस्तित्त्वात आल्यापासून गुजरातमध्ये दारूबंदी (Liquor Ban in Gujarat) आहे. 1960 पासून त्यांची अंंमलबजावणी करण्यात येत आहे. गुजरातमधील दारूबंदीचा निर्णय फक्त कागदोपत्री असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळतं आहे. अनेकदा महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, दीव आणि दमणमधून अवैधरित्या दारू गुजरातमध्ये आणली जात असल्याचा आरोप नेहमी करण्यात आला आहे.