संभल (उत्तर प्रदेश), 18 जुलै : उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात अज्ञात इसमांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली. या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कैद्यांची सुटका करून ते फरारही झाले.
या पोलिसांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करणं गरजेचं होतं पण त्यावेळी अँब्युलन्सही मिळाली नाही. त्याच गडबडीत पोलीस कर्मचाऱ्यांचे मृतदेह भाजी वाहून नेणाऱ्या टेम्पोमधून हॉस्पिटलला न्यावे लागले.
ज्या पोलीस व्हॅनमधून हे पोलीस जात होते त्या व्हॅनची स्थिती तर खूपच दयनीय होती. ही व्हॅन सुरू करण्यासाठी धक्के मारावे लागत होते. त्यामुळे या व्हॅनमधून पोलिसांना हॉस्पिटलमध्ये नेणं अशक्यच होतं.
म्हणून प्रोटोकॉल पाळला नाही
या पोलिसांना उपचारासाठी तातडीने घेऊन जाणं आवश्यक होतं. त्यामुळे आम्ही प्रोटोकॉल पाळत बसलो नाही, असं डीजीपी ओ. पी. सिंह यांनी यांनी सांगितलं. पोलिसांची व्हॅन काही कैद्यांना घेऊन मुरादाबादला जात होती तेव्हा काही अज्ञात इसमांनी जबरदस्तीने ही गाडी थांबवली. त्यांनी दोन पोलिसांना गोळ्या घातल्या. त्याच पोलिसांच्या बंदुका आणि 3 कैद्यांना घेऊन ते फरार झाले.
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं हत्या प्रकरण, त्याच्या पत्नीविरुद्ध आरोपपत्र दाखल
या घटनेमध्ये शहीद झालेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याचसोबत पोलिसांच्या पत्नीला पेन्शन आणि कुटुंबातल्या एकाला नोकरी देण्याचे आदेशही मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी दिले आहेत.
==============================================================================================
VIDEO : खेकड्याने डोंगरीतली इमारत पाडली का? अजित पवारांची टोलेबाजी