नवी दिल्ली 8 फेब्रुवारी: दिल्लीमधली एक मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण दिल्लीच्या ग्रेटर कैलास ठाण्यात तैनात विक्रम नावाच्या एका हवालदारानं अत्यंत कौतुकास्पद काम केलं आहे. त्यांनी दोन वृद्ध माणसांना (Senior citizen) मृत्यूच्या जाळ्यातून परत आणलं आहे. ग्रेटर कैलास (Greater Kailash) स्थित एका घरात आग (Fire) लागली होती, या आगीत दोन वृद्ध अडकले होते. अशात या हवालदारानं स्वतःचा जीव धोक्यात टाकत घरात अडकलेल्या या दोघांना बाहेर काढलं आहे. या दोन्ही व्यक्तींचं वय 90 च्या आसपास आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरातील घरात आग लागल्याचं समजताच विक्रम यांनी घटनास्थळी धाव घेतली. विक्रम यांनी आगीत अडकलेल्या या दोघांनाही मृत्यूच्या दारातून परत आणलं. दोन वृद्धांना वाचवल्याची बातमी मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी विक्रम यांच्या या कामाचं कौतुक केलं. स्वतःच्या जिवाची काहीही पर्वा न करता आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणारे विक्रम हे या घटनेमुळे दिल्लीच्या जनतेसाठी खरे सिंघम ठरले. कैलास यांनी घराचं कुलूप तोडून आतमध्ये जात या दोघांचा जीव वाचवला. सोबतच त्यांनी प्रसंगावधान राखत गॅस सप्लाय बंद केल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे.
Brave Constable Vikram of PS Greater Kailash saved the lives of senior citizens during a raging fire.He also broke the lock of the house on fire but also cut gas supply to avert any disaster#KeepingDelhiSafe #DelhiPolice@SChoudharyIPS @CPDelhi @LtGovDelhi @DelhiPolice pic.twitter.com/3ZjsMirew9
— DCP South Delhi (@DCPSouthDelhi) February 8, 2021
याआधी रविवारीदेखील दिल्लीच्या ओखला फेज 2 परिसरात आग लागल्याची बातमी समोर आली होती. ही आग आसपासच्या परिसरातही पसरली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग संजय कॉलनीमध्ये लागली होती आणि आगीनं बघता बघता भीषण रूप धारण केलं होतं. स्थानिक लोकांनी फोन करून माहिती दिल्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं आणि आग विझवण्याचे प्रयत्न केले. या आगीत प्रचंड नुकसान झालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fire, Police, Rescue operation