Home /News /national /

मुलाच्या 'बर्थ डे'ला वडिलांची तिरडी उचलण्याची वेळ, रागाने उद्धवस्त झालं अख्ख कुटुंब

मुलाच्या 'बर्थ डे'ला वडिलांची तिरडी उचलण्याची वेळ, रागाने उद्धवस्त झालं अख्ख कुटुंब

मुलाच्या वाढदिवसालाच त्याच्या वडिलांचं तिरडी उचलण्याची वेळ जोशी कुटुंबावर आली आहे.

    देहरादून, 7 जानेवारी : पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येनं खळबळ माजली आहे. मोहित जोशी असं हत्या झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. मोहित जोशी याच्यासोबत काम करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलच्या रागाने एका अख्ख्या कुटुंबाला उद्धवस्त केलं आहे. त्यामुळे मुलाच्या वाढदिवसालाच त्याच्या वडिलांचं तिरडी उचलण्याची वेळ जोशी कुटुंबावर आली आहे. कॉन्स्टेबल असलेला मोहित जोशी सप्टेंबर महिन्यात आपल्या भाचीच्या बारशाच्या कार्यक्रमासाठी घरी आला होता. त्यानंतर त्याने आपल्या मुलाच्या वाढदिवसाला म्हणजेच 7 जानेवारीला पुन्हा घरी येईल, असं कुटुंबाला सांगितलं. 7 जानेवारीला मोहित जोशी याचा मुलगा रौनक याचा वाढदिवस होता. त्यामुळे मुलाचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा करण्याची मोहितची इच्छा होती. पण दुर्दैवाने आता त्याच दिवशी मोहितवर अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. 'कॉल गर्ल'साठी फोन करणं पडलं महागात, स्वत:च्या बायकोचाच फोटो SEX वर्करच्या पेशात झाला व्हायरल उत्तराखंडमधील मोहित हा आपली आई लीला जोशी आणि भाऊ राजीव उर्फ रिंकूवर खूप प्रेम करत होता. 'मोहित 1 जानेवारीला आपली आई, भाऊ आणि चुलत भावांसोबत फोनवर बोलला होता. मात्र त्यानंतर अवघ्या सहा दिवसांतच थेट मोहितचा मृतदेहच जोशी कुटुंबाला पाहावा लागला. कारण मोहित जोशी या पोलीस कर्मचाऱ्याला त्याचाच सहकारी असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने दरीत ढकलून संपवलं होतं. सहकाऱ्याच्या रागामुळे एक हसतं-खेळतं कुटुंब उद्धवस्त झालं. मोहितच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी गिरीश जोशी याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तसंच गिरीश जोशी याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान पोलीसांनी आपल्या खाक्या दाखवताच गिरीश जोशी याने गुन्हा कबूल केला. 'माझ्या खोलीबाहेर कोणीतरी अस्वच्छता केली होती. मला त्याबाबत मोहितवर संशय आला. यावरूनच आमच्या दोघांमध्ये मोठं भांडणही झालं. त्यानंतर दोन जानेवारी मी माझ्या ऑल्टो कारमध्ये मोहितला घेऊन एका डोंगरावर गेलो. तिथं मोहित लघुशंका करण्यास गेला तेव्हा मी त्याला मागून धक्का दिला,' असं आरोपी गिरीश जोशीने पोलिसांसमोर म्हटलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Crime, Murder story

    पुढील बातम्या