• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Amazon च्या माध्यमातून गांजाची ऑनलाईन तस्करी, दोन आरोपींना अटक

Amazon च्या माध्यमातून गांजाची ऑनलाईन तस्करी, दोन आरोपींना अटक

मध्य प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Amazon च्या वेबसाईटवरुन विशाखापट्टनममधून मध्य प्रदेशात कडीपत्त्याच्या नावाखाली गांजाची तस्करी केली जात होती. या माध्यमातून आतापर्यंत जवळपास एक टन गांजाची तस्करी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

 • Share this:
  भोपाळ, 14 नोव्हेंबर : कोणतीही छोट्यातली छोटी वस्तू घ्यायची असेल तर अनेकजण हमखास अॅमेझॉन (Amazon India) या ऑनलाईन शॉपिंग साईटल भेट देतात. मात्र याच अॅमेझॉनचा गांजाच्या तस्करीसाठी (Marijuana Smuggling) वापर होऊ शकतो याचा कुणी विचारही केला नसेल. मात्र अमेझॉनचा गैरवापर (Misuse of Amazon) करुन गांजाची मोठी तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी 20 किलो गांजासह दोन आरोपींना अटक केली आहे. मध्य प्रदेशात हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Amazon च्या वेबसाईटवरुन विशाखापट्टनममधून मध्य प्रदेशात कडीपत्त्याच्या नावाखाली गांजाची तस्करी केली जात होती. या माध्यमातून आतापर्यंत जवळपास एक टन गांजाची तस्करी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सूरज उर्फ कल्लू आणि पिंटू उर्फ बिजेंद्रल सिंह तोमर या दोन आरोपींनी अटक केली आहे. 20 किलो गांजाची एक ऑर्डर विशाखापट्टनमवरुन अमेझॉनच्या माध्यमातून मागवली होती. भिंड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक मनोज कुमार यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना माहिती दिली की, गेल्या चार महिन्यांपासून अमेझॉनवरुन ही तस्करी सुरु होती. त्यामध्ये तब्बल एक टन गांजाची तस्करी करण्यात आली आहे. याची किंमत ही 1.10 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतंय. कंगना रणौतनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विक्रम गोखलेंच मोठं विधान
   पोलीस चौकशीत दोन्ही आरोपींकडून त्यांच्या टोळीतील आणखी एका सहकाऱ्याची माहिती समोर आली आहे. त्यालाही पोलिसांनी हरिद्वारमधून अटक केली आहे. आरोपी सूरज उर्फ कल्लू पवैया हा कडी पत्त्याच्या नावाखाली ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि इतर ठिकाणी गांजाची तस्करी करत होता.
  हर्बल उत्पादनं आणि कडी पत्ता उत्पादनाचा विक्रेत्याच्या नावाखाली रजिस्ट्रेशन आरोपी सूरजने एका कपड्याच्या कंपनीच्या नावाखाली हर्बल उत्पादनं आणि कडी पत्ता उत्पादनाचा विक्रेत्याच्या नावाखाली रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यानंतर त्याला अमेझॉनवर बारकोड मिळाला होता. Shilpa Shetty आणि Raj Kundra ने मिळून केली फसवणूक, गुन्हा दाखल CAIT इंडियाकडून गंभीर दखल CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भारतीया आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, विक्रेत्याची नोंदणी करण्यापूर्वी Amazon ने विक्रेत्याची खरी आणि विश्वासार्हता जाणून घेण्यासाठी KYC करायला हवे होते. तसेच, Amazon ने गांजा सारख्या बेकायदेशीर वस्तूंच्या विक्रीला परवानगी दिली नसावी. एवढी मोठी कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग वापरून बेकायदेशीर वस्तूंचे व्यवहार का थांबवत नाही हे आम्हाला समजत नाही. कंपनी या तंत्रांचा वापर करून छोटे व्यावसायिक आणि छोट्या भारतीय उत्पादकांच्या वस्तू तिला लेबल लावून विकते. एनसीबीसह देशातील अनेक तपास यंत्रणांनी अॅमेझॉनवर कारवाई करण्याची गरज आहे. मनी लॉंड्रिंग आणि इतर प्रकारच्या अपराधासाठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर होत असेल तर त्याचा वापर देशविघातक कृत्यासाठी केला जाण्याची जास्त शक्यता आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: