चंदीगढ, 16 एप्रिल : पंजाबमधील पटियाला जिल्ह्यात रविवारी निहंग्यांच्या एका गटाने पोलीस अधिकाऱ्यावर सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली होती. यामध्ये Assistant Sub-Inspector हरजीत सिंग यांचा हात तलवारीने कापण्यात आला होता. त्यांच्यावर जवळपास साडेसात तास शस्त्रक्रिया करून हात जोडण्यात आला होता. या पोलीस अधिकाऱ्याला पदोन्नती देण्यात आली आहे.
रविवारी पोलीस लॉकडाऊनदरम्यान ड्यूटीवर तैनात होते. येथील पटियाळा भाजी मार्केटमध्ये गर्दी वाढत असल्याने त्यांनी कारवाई केली. अशावेळी काहींनी त्यांच्यावर हल्ला केला. मात्र हरजीत सिंग डगमगले नाहीत. अशा बिकट परिस्थितीत धैर्याने ते या परिस्थितीला सामोरे गेले. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं आहे.
Assistant Sub-Inspector Harjeet Singh, whose hand was chopped off (& later replanted) fighting off an attack, while enforcing curfew at the Patiala Sabzi Mandi, has been promoted to the rank of Sub-Inspector, in recognition of his exemplary courage: Punjab Chief Minister's Office pic.twitter.com/pytVaNzr4O
— ANI (@ANI) April 16, 2020
पाटियाळा भाजी मार्केट येथे पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. यात हल्लेखोरांनी हरजीत सिंह या पोलिसाचा हात तलवारीने कापला होता. त्यांच्या या धैर्याचं कौतुक करीत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी हरजीत सिंह यांना सब-इन्स्पेक्टर पदावर बढती दिली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितलं की, हरजीत सिंग यांचा हात जोडण्यासाठी पीजीआयमध्ये साडेसात तास ऑपरेशन झालं. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, 'मी सर्व डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या अवघड शस्त्रक्रियेसाठी आभार मानतो. तसंच एएसआय हरजीत सिंग लवकर बरे होवोत अशी प्रार्थना करतो.' पंजाबच्या पटियालातील भाजी मार्केट सनौर रोडवर रविवारी सकाळी पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 7 जणांना ताब्यात घेतलं होतं. या सातपैकी 5 लोक असे आहेत जे पाटियालातील भाजी मार्केटच्या बाहेर झालेल्या हल्ल्यात सहभागी होते.
संबंधित -तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांना ED चा दणका, लवकरच चौकशीला बोलावणार
धोक्याची घंटा! मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 2000 पार, आज 107 नवे रुग्ण दाखल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Punjab police